जळगांव जामोद:-जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम धानोरा महासिद्ध येथिल ग्रामस्थ पुंडलिक वाकोडे यांनी पंचायत समिती जळगांव जामोद येथे निवेदन देऊन १३ ऑगस्ट २०२४ पासुन आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे या निवेदनात नमुद केले आहे की घरकुल यादी मध्ये संबंधित ग्रामसेवक यांनी घोळ करून अनेक लाभार्थी यांना लाभापासुन वंचित ठेवले आहे यामध्ये ग्रामसेवक यांनी यादित असलेल्या लाभार्थी यांची नावाच्या यादीतील क्रमांकानुसार न घेता यादित अनियमितता केलीली आहे या मुजोर सचिवाशी वेळोवेळी चर्चा करूनहि काही उपयोग न झाल्याने शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागत आहे तसेच पळशी सुपो येथील ज्ञानेश्वर कोकाटे व नागरिकांनी सुद्धा यादित अनियमितता झाल्याने पंचायत समिती जळगांव जामोद समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे यावर गटविकास अधिकारी काय मार्ग काढतील या कडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 Comments