Advertisement

अबू आसिम आजमी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जामोद येथे समाजवादी जिल्हा अध्यक्ष अजहर खान यांच्या हस्ते शालेय पुस्तक व खाऊचे वाटप

*अबू आसिम आजमी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जामोद येथे समाजवादी जिल्हा अध्यक्ष अजहर खान यांच्या हस्ते शालेय पुस्तक व खाऊचे वाटप*

जळगाव जामोद:- 

दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा माननीय श्री अबू असीम आजमी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जामोद तालुक्यातील विविध शाळेत जाऊन  विद्यार्थ्यांना पुस्तक व खाऊचे वाटप करण्यात आले. मा. श्री. अबु असिम आजमी साहेब हे लोकप्रिय असून जनतेच्या हितासाठी दिवस-रात्र एक करून जनतेचे प्रश्न मांडून व जनतेला  न्याय मिळून देण्याकरिता निडरपणे उभे राहतात म्हणून मा. श्री. अबू असीम आजमी साहेब हे जनतेचे लोकप्रिय नेते म्हणून अख्या महाराष्ट्र मध्ये ओळखल्या जातात व इतरही राज्यात त्यांचा मोठाच नाव आहे कारण ते जात, धर्म, ना पाहता फक्त लोकांच्या समस्या जाणून घेऊन व समस्या चा निर्वाह कसा होईल याकडे जास्त लक्ष देतात व लोकांना सरकारकडून आर्थिक मदत व न्याय कसा मिळेल यासाठी ते जनतेसोबत ठाम उभे राहतात, म्हणून महाराष्ट्र तर नाहीच युपी बिहार या राज्यातील त्यांचा वाढदिवस उत्साहात सादर करतात कारण ते राजनीती न करता फक्त जनतेचे हितासाठी काम करतात म्हणून ते जनतेचे लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. दिनांक ८ ऑगस्ट रोजी यांच्या वाढदिवस असते म्हणून समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या वाढदिवसा दिवशी अख्या महाराष्ट्र मध्ये त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करतात. तसेच आज  दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी जळगाव जामोद येथे मा. श्री. आजमी साहेब यांचा वाढदिवस बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अझर खान यांनी शाळकरी मुलांना पुस्तक व खाऊचे वाटप करून वाढदिवस उत्साहात सादर केला. साजरा करताना  समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मा. श्री. अजहर खान अमानुल्ला खान, समाजवादी पार्टी प्रदेश सदस्य लियाकत खान, समाजवादी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल रहीम खान, समाजवादी पार्टी जिल्हा महासचिव तौसीफ जमदार, जाबिर भाई, शेख युसूफ भाई, अंजुम भाई, शेख इमाम भाई, अकबर भाई, बाबू चाचा, व बहुसंख्यक कार्य करते पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments