Advertisement

पोलीस व पत्रकारांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना इरफान शेख व मंगेश राजनकार ठरले मॅन ऑफ द मॅच

पोलीस व पत्रकारांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना 

इरफान शेख व मंगेश राजनकार ठरले मॅन ऑफ द मॅच 

जळगाव जामोद_
 आज दिनांक ७ जानेवारी रोजी शहरातील मोदी ग्राउंड मध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पोलीस वर्धापन दिन निमित्त पोलीस विभाग व पत्रकार यांच्यामध्ये क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.​"कलम आणि वर्दी एकत्र!  जळगाव जामोदच्या मोदी मैदानावर पोलीस आणि पत्रकारांमध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना पार पडला. या क्रिकेट सामन्यामध्ये पोलीस संघाने पत्रकार संघाचा  9 गडी  राखून पराभव केला.

यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी स्वतः उपस्थित राहुन दोन्ही संघाचे मनोधैर्य वाढविले तसेच मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या पत्रकार मंगेश राजनकार व पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांना प्रोत्साहन  500 रुपये बक्षीस दिले. या क्रिकेट सामन्याच्या अंपायरपदी पोलीस सचिन राजपूत व पत्रकार उत्तम वानखडे यांनी काम पाहिले, तर नागेश भटकर यांनी कॉमेंट्री केली. यावेळी पत्रकार कैलास बाप्पू देशमुख , शमीम देशमुख, विनोद वानखडे, जाफर खान, गणेश भड, गजानन सोनटक्के,अश्विन राजपूत,अनिल भगत, सागर झनके,मंगल काकडे, शिवदास सोनोणे,संजय दांडगे, लियाकत खान, राजेंद्र ससाने, मंगेश टाकसाळ, अमोल भगत, मनीष ताडे,किशोर दाताळकर, गणेश गिरे, वैभव वडोदे, विजय वानखडे, संजय बहुरूपी, संतोष कुलथे, इत्यादी पत्रकार बांधव तसेच एपीआय नागेश मोहोळ, पीएसआय नागेश खाडे, पोहेकॉ निलेश पुंडे,पोहेकॉ बाळकृष्ण पवार,पोकॉ सतीश पटोले, मधुकर गाढे, भारत बोंद्रे, अमोल नंदाने, स्वप्निल झुंजारकर,  स्वप्निल मस्के, प्रशांत झाल्टे, सुपेश तायडे, समाधान शिंगणे, इत्यादी पोलीस यावेळेस उपस्थित होते .


जळगाव जामोद येथे पोलीस आणि पत्रकार यांच्यात झालेला हा सामना नक्कीच कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे दोन्ही क्षेत्रांतील व्यक्तींमध्ये समन्वय आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होते.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही संघांमध्ये हा सामना संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments