Advertisement

विदर्भात मान्सूनच्या धारा 21 जून नंतर बरसणार प्रकाशभाई पारेख* *जुलै महिन्यात समाधानकारक तर सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस*

*विदर्भात मान्सूनच्या धारा 21 जून नंतर बरसणार प्रकाशभाई पारेख* 

 *जुलै महिन्यात समाधानकारक तर सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस* 

 *(गिरीश पळसोदकर) खामगाव* विदर्भात यंदाच्या पावसाळ्यातील मान्सूनच्या पावसाच्या धारा 21 जून नंतर बरसतील.पाऊस उशिरा बरसण्याचे मुख्यकारण म्हणजे मे महिन्यात सुपर एलनिनो चा प्रवाह अधिक वाढला आहे. कोकणात रेंगाळलेला पाऊस हा पुढे सरकण्यासाठी अद्याप पावेतो चक्राकार वारे तयार झालेले नाही.त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील मान्सूनच्या सरी या 21 जून च्यापुढे बरसतील असा अंदाज येथील हवामान अभ्यासक प्रकाशभाई पारेख यांनी वर्तविला आहे.पावसाचे आगमन उशिराने होत असल्याने याचा सर्वाधिक फटका हा जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा बरोबरच पिकाचे उत्पादनाला बसणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाऊस उशिरा पडण्याबरोबरच यंदा सरासरीपेक्षा 20 ते 25 टक्के पाऊस कमी बरसण्याचा अंदाज प्रकाशभाई पारेख यांनी वर्तविला.त्यांच्या या अंदाजाला हवामान खात्याने यंदा कमी पाऊस पडेल असा वर्तविलेला अंदाज हा पुष्टी देणारा आहे.

 चातक पक्षाप्रमाणे जिल्हासह राज्यभरातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे.आता 21 जून नंतर पाऊस येणार असल्याच्या अंदाजाने बळीराजा वरील संकटाचे ढग अधिक गडद झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून वाहणाऱ्या वाऱ्याचा परिणाम परिणाम हा आभाळात अधून मधून जमा होणाऱ्या ढगांवर होत आहे. आभाळात काळे ढग जमा होत असले तरी त्या ढगांमध्ये पाहिजे ते प्रमाणात पाणी जमा होत  नसल्याने सर्वत्र पाऊस पडत नसल्याचे सांगून प्रकाशभाई म्हणाले की,1877 साली म्हणजे 150 वर्षांपूर्वी सुपर एल निनो आला होता. त्यावेळेस उन्हाची तीव्रता अधिकच आणि त्यावेळेस पाऊसही कमी बरसला होता.उन्हाच्या तीव्रतेने देशातील हजारो  लोकांना उष्माघाताने ग्रासले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता पण यंदाच्या सुपर एलनिनो ची तीव्रता काही प्रमाणात कमी आहे.

 *उष्णतेच्या तीव्रतेने तापमानात वाढ*

 गेल्यावर्षी 2025 मधील उन्हाळ्यातील तापमानाचा विचार केला तर जून महिन्यात तापमानाचा पार हा 32 ते 30 अंश सेल्सिअस वर होता पण यंदा जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटला असला तरी हॉटसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहराच्या तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सियस च्या खाली उतरण्याचे नाव घेत नाही. पहाटेचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके सध्या राहत असल्याचे प्रकाशभाई यांनी सांगितले. 

 *सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस* 

 यंदा जून महिन्याच्या शेवटी पाऊस पडेल.जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस बसेल आणि ऑगस्ट महिन्यात कमी तर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस बसेल असा अंदाजही प्रकाशभाई पारेख यांनी यंदाच्या पावसाळ्यातील पावसाबाबत अंदाज वर्तविला  आहे. यंदा जून महिन्यात आत्तापर्यंत पाऊस न येण्याच्या परिस्थितीला सुपरनिनो चा प्रभाव आहे.

 *मी 55 वर्षापासून शहरातील उन्हाळ्यातील दररोजच्या तापमानाची नोंद ठेवण्याचा छंद जोपासत आहे. परंतु 60 ते 70 वर्षात एवढे ऊन व होणारी गर्मी अनुभवली नाही. गेल्या 20 ते 25 वर्षाचा पावसाचा इतिहास पाहता जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या जोरदार सरी  बरसतात परंतु यंदाचा जून महिन्यातील दोन आठवडे अपवाद ठरलेल आहे.*

 *प्रकाशभाई पारेख* 
*(हवामान अभ्यासक)* 
 *खामगाव जि.बुलढाणा*

Post a Comment

0 Comments