*लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या विकासवादी भुमिकेला सोबत घेवुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार तळगाळापर्यंत पोहचविण्यासाठी संकल्पबध्द व्हा....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
*राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने पक्षाचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*
खामगाव /(संतोष आटोळे) समर्पण,संघर्ष आणि संकल्प हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्रीद असुन लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 27 वर्षांच्या प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देत जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम पक्षाने प्रामाणिकतेने केले आहे. स्व.अजितदादा पवार साहेब हे शब्दाचे धनी होते.दादांची काम करण्याची शैली, प्रशासनावर असलेली उत्तम पकड यामुळे सर्व सामान्यांच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थान निर्माण केले. विकासाचा निधी शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचवायचा, हे दादांनी आपल्या कार्यपद्धतीतून दाखवून दिले आहे. परंतू दुर्दैवाने आज दादा आपल्यामध्ये नाहीत , दादांची उणीव नेहमी भासत राहील. अश्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी खचून न जाता स्व.अजितदादा पवार यांच्या विकासवादी भूमिकेला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी संकल्पबद्ध व्हावे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. बुधवार दि.10 जून 2026 रोजी महात्मा गांधी भवन येथे खामगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, खामगाव राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष अध्यक्ष मनोज वानखडे, शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष बिलाल खॉ पठान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहरअध्यक्षा सौ.शारदाताई शर्मा, शेगाव पं.स. चे माजी सभापती विजय काटोले, कृ.उ.बा.स.चे माजी सभापती सुभाष पेसोडे,कृ.उ.बा.स.चे संचालक विलाससिंग इंगळे, शहर उपाध्यक्ष नरहरी टिकार, शहर कार्याध्यक्ष केशव कापले, नगरसेवक तहसीन शहा, अजीम कुरेशी, सलीमभाई पत्रकार, प्रफुल कुळकर्णी , निलेश इरशीद आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हा शिव-शाहु-फुले-आंबेडकर-मौलाना अबुल कलाम आझाद,महात्मा गांधी या थोर महापुरुषांच्या विचार धारेवर चालणारा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्यामुळे आपण अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. दादा हे शब्दाचे धनी होते. पक्ष प्रवेशावेळी दादांनी जो शब्द दिला होता तो शब्द दादांनी नेहमी पाळला. दादा हयात असतांना त्यांनी मतदार संघातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने दखल घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खामगाव विधानसभा मतदार संघासाठी कोटयावधी रुपयांचा विकास निधी दिला. भविष्यात जिल्हा परिषद,ग्राम पंचायतच्या निवडणुका होणार आहे. अश्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी सर्व निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने कामाला लागावे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार,पार्थदादा पवार यांचे हात बळकट करावे असे आवाहनही सानंदांनी केले.
सर्व प्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थितांना लाडुचे वाटप करुन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो-विजय असो, वर्धापन दिन चिरायु हो-चिरायु हो, अमर रहे-अमर रहे , स्व.अजितदादा पवार साहेब अमर रहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, श्रीमती सुनेत्राताई पवार आगे बढो-हम तुम्हारे साथ है , हम सब एक है अश्या गगन भेदी घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला सौ.प्रमीलाताई चोपडे, कृष्णा पाटील, अविनाश ढगे , आनंद गायगोळ, आनंद राणा , श्याम मोरे, धनंजय वानखडे,, पवन पवार, सैयद फारुख, मोहम्मद सहेलीम, शेख युनूस , जाकीर शाह, निलेश तासतोडे,शिवाजीराव पांढरे, सुर्या कापडे,प्रशांत धोटे,मदन गावंडे, सत्यनारायण शर्मा , ओम छंगाणी, वैभव वानखडे, एजाज देशमुख, राजेश धामणकार, वैभव धानोरे, विठ्ठल धानोरे, श्रीकृष्ण ढबाले, रोशन शाह,हारुण शाह,निलेश शर्मा, अक्षय बदरखे, युवराज भेरडे, शेख राजीक, विलास पांढरे, राजीक खान, विक्रम सिंग सोळंके,विपुल साबळे, विजय नगरे, प्रल्हाद बोरुडे, विजय खंडारे,मोहन कुळकर्णी, विलासराव शेळके, अवधुत टिकार,नंदकिशोर नवथळे, जुबैर शाह, अब्दुल जाकीर, तुकाराम राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments