Advertisement

जळगाव जामोद वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. आर. पी. विश्वेकर; उपाध्यक्ष व सचिवांचीही बिनविरोध निवड.. सौ गीता सोनोने

जळगाव जामोद वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. आर. पी. विश्वेकर; उपाध्यक्ष व सचिवांचीही बिनविरोध निवड.. सौ गीता सोनोने


जळगाव जामोद येथील वकील संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज, ११ जून २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता वकील संघाच्या सभागृहात संपन्न झाली. या सभेत वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी ॲड. आर. पी. विश्वेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद वकील संघाच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये नवीन अध्यक्ष निवडीसाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये परंपरेनुसार आणि सर्व संमतीने नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.
​यात उपाध्यक्ष म्हणून ॲड. एस. व्ही. खुपसे यांची तर सचिव म्हणून ॲड. ए. बी. वाघ यांची एकमताने निवडणूक करण्यात आली.
​या निवडीसाठी सूचक म्हणून ॲड. आर. एस. काकडे यांनी काम पाहिले, तर अनुमोदक म्हणून ॲड. डी. बी. इंगळे यांनी पाठबळ दिले. या संदर्भातील ठराव सर्व वकील सदस्यांच्या संमतीने एकमुखाने मंजूर करण्यात आला.
​नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments