Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा**रुग्णांना फळे-बिस्कीटांचे वाटप* *रुग्णालयातील गैरसोयींवर माजी आमदार राणा सानंदा यांची नाराजी*खामगाव / संतोष आटोळे

*राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*
*रुग्णांना फळे-बिस्कीटांचे वाटप* 
*रुग्णालयातील गैरसोयींवर माजी आमदार राणा सानंदा यांची नाराजी*
खामगाव / संतोष आटोळे
अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खामगाव शहर व तालुक्याच्या वतीने बुधवार, दि. १० जून २०२६ रोजी पक्षाचा २७ वा वर्धापन दिन विविध विधायक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
स्थापना दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबा फुले सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबराव देशमुख, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, शहराध्यक्षा सरस्वतीताई खासने, बिलाल खान पठाण, शारदाताई शर्मा, विजय काटोले, सुभाष पेसोडे, विलाससिंग इंगळे, नरहरी टिकार, केशव कापले, तहसीन शहा, अजीम कुरेशी, सलीमभाई पत्रकार, पुंजाजी टिकार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप केले तसेच वर्धापन दिनानिमित्त लाडू वाटून त्यांचे तोंड गोड केले. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो", "वर्धापन दिन चिरायू हो", "सुनेत्राताई पवार आगे बढो-हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाला प्रमिलाताई चोपडे, कृष्णा पाटील, अविनाश ढगे, आनंद गायगोळ, आनंद राणा, श्याम मोरे, धनंजय वानखडे, पवन पवार, सैयद फारुख, मोहम्मद सहेलीम, शेख युनूस, जाकीर शाह, निलेश तासतोडे, शिवाजीराव पांढरे, प्रफुल कुलकर्णी, प्रशांत धोटे, मदन गावंडे, सत्यनारायण शर्मा, ओम छंगाणी, वैभव वानखडे, एजाज देशमुख, राजेश धामणकार, विठ्ठल धानोरे, श्रीकृष्ण ढबाले, रोशन शाह, हारुण शाह, अक्षय बदरखे, युवराज भेरडे, विक्रमसिंग सोळंके, विपुल साबळे, विजय नगरे, प्रल्हाद बोरुडे, विजय खंडारे, मोहन कुलकर्णी, विलासराव शेळके, अवधूत टिकार, नंदकिशोर नवथळे, जुबैर शाह, अब्दुल जाकीर, तुकाराम राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फळे व बिस्कीटांचे वाटप करताना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी रुग्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी रुग्णालयातील वार्डामध्ये उन्हाळ्यात रुग्णांच्या सोयीसाठी लावण्यात आलेला कुलर पाण्याअभावी बंद असल्याची तसेच खिडक्यांवरील जाळ्या व अस्वच्छतेबाबत रुग्णांनी तक्रार केली.
यावर सानंदा यांनी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांना दूरध्वनीवर संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. भविष्यात रुग्णांना अशा प्रकारच्या गैरसोयी होत असल्यास आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments