*हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांचे त्याग,शौर्य,पराक्रम आणि स्वाभिमानाची गाथा प्रेरणा देणारी ... माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
*हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठया उत्साहात साजरी*
हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंहजी हे भारतीय इतिहासातील अद्वितीय शौर्य,अटळ स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे सर्वोच्च प्रतीक आहे. महाराणा प्रतापसिंह यांनी प्रतिकुल परिस्थिती असतांनाही कधीही शरणागती पत्कारली नाही.मातृभुमिच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या जीवनातील त्याग,शौर्य,पराक्रम आणि स्वाभिमानाची गाथा आजही प्रत्येकाला संकटाशी दोन हात करण्याची प्रेरणा देते असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.बुधवार दि.17 जून 2026 रोजी ज्येष्ठ शुक्ल तृतीयेच्या दिवशी तीथीनुसार विर शिरोमणी,हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची 486 वी जयंती टॉवर चौक येथील भारतरत्न स्व.राजीव गांधी उद्यान येथे राजपुत समाजभुषण,शक्तीउपासक राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली व राजपुत समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदिपसिंग राजपुत,राजपुत समाजाचे अध्यक्ष प्रमोदसिंह पाटील,माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,ज्येष्ठ नेते विश्वपालसिंह जाधव,पंजाबरावदादा देशमुख,महेंद्रसिंग राठोड,राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, तालुका अध्यक्ष मनोज वानखडे,श्रीकांतसिंह बयस आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह हे भक्ती,शक्ती आणि युक्ती यांचा सुरेख संगम होते.जीवनात यश मिळाले तर अहंकार वाढवु नका आणि अपयश आले तर खचुन जावु नका हा संदेश त्यांच्या जीवनचरित्रातुन मिळतो.समाजभुषण,शक्तीउपासक राणा गोकुलसिंहजी
सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षापासुन खामगाव शहरामध्ये महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कुस्ती व कबडड्ी स्पर्धांचे आयोजन करुन युवकांमध्ये क्रिडा भावना व राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे कार्य निरंतरपणे सुरु आहे. खामगाव शहरात उभारण्यात आलेला महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारुढ पुतळा हा केवळ स्मारक नसुन संकटावर मात करण्याची,स्वाभिमानाने जगण्याची आणि राष्ट्रहितासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा दिपस्तंभ आहे. असे सांगुन राणाजींच्या जयंतीदिनी सर्वांनी राष्ट्रहितासाठी,समाज हितासाठी विधायक कार्य करण्याचा संकल्प घ्यावा असे सांगुन त्यांनी उपस्थितांना हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदिपसिंग राजपुत यांनी हिंद की खातीर शीश मिटा दे हम
या कवितेच्या माध्यमातून महाराणा प्रताप व राजपुत समाजाच्या शौर्याबदद्ल माहिती दिली. यावेळी डॉ.आर.के.राजपुत यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातुन बोलतांना सांगितले की,महाराणा प्रतापसिंह यांच्या सारखी जर जिदद् असेल तर नेहमी विजय प्राप्त होतो.कितीही संकटे आले तरी महाराणाजी डगमगले नाही.ते संकटाला शौर्याने सामोरे गेले.आपले प्राण गेले तरी राजपुत आपले वचन मोडत नाही.खामगाव मतदार संघामध्ये राजपुत समाजाला राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या रुपाने अत्यंत चारित्र्यवान आणि आदर्श नेतृत्व मिळालेले आहे. सर्वांनी एकसंघ होवुन असे नेतृत्व वाढविले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
सर्वप्रथम राणाजींच्या जयंतीदिनी समाजभुषण,शक्तीउपासक राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्या हस्ते अश्वारुढ पुतळयासमोर पादुका पुजन करुन ध्वजारोहन व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी राणा दिग्वीजयसिंह सानंदा,दुर्गासिंग ठाकुर व रोहितसिंग राजपुत यांच्या हस्ते हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह याच्या अश्वारुढ पुतळयाचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. जयंतीनिमित्त मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते उपस्थितांना लाडु वाटप करुन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करुन हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह की जय, जब तक सुरज चाँद रहेंगा-महाराणाजी का नाम रहेंगा,जय राणा-जय शिवराणा,छत्रपती शिवाजी महाराज की जय, हम सब एक है,भारत माता की जय अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन पंजाबरावदादा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन विश्वपालसिंह जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला सहकारमित्र राणा राजेंद्रसिंह सानंदा,उद्योजक राणा मुकेशकुमार सानंदा,राणा आनंदकुमार सानंदा,राणा सागरकुमार सानंदा,राणा अमेयकुमार सानंदा,राणा गौरवकुमार सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा सौ.शारदाताई शर्मा, श्रीमती सुलोचना कळींगकर,मलकापुर करणी सेनेचे शहर अध्यक्ष पप्पु ठाकुर,श्रावणसिंह राजपुत,मुन्नाभाऊ जाधव, कृ.उ.बा.स.संचालक विलाससिंग इंगळे,विजय काटोले,राष्ट्रवादीचे खामगाव शहर उपाध्यक्ष नरहरी टीकार,दुर्गासिंग ठाकुर,सुभाषसिंग ठाकुर,किशोरसिंह ठाकुर,तहसिलदारसिंग राजपुत,नारायणसिंह राजपुत,अनुपसिंह ठाकुर, ऋषभसिंह ठाकुर,राजेंद्रसिंह गौतम,प्रतापसिंह ठाकुर,अजयसिंह ठाकुर,संजय शर्मा,राहुल पाटील, दयालसिंग पवार,मोहनसिंग बॅनर्जी,किशोरसिंह राजपुत, अमोल ठाकुर,प्रमोद महाजन,अजय वतपाळ,सुरेश वतपाळ,प्रमोदसिंग जाधव,अक्षयसिंह राजपुत, आनंद राणा, अमोल जाधव,अशोकबाप्पु देशमुख,गणेशआप्पा इंगळे,नंदुसिंग तोमर,कल्याणसिंग तोमर,कल्याणसिंग वतपाळ,शिवाजीराव पांढरे,विठठ्ल धानोरे,विजय रायगावकर,संजय लाहुडकार,अभिजीसिंह ठाकुर,सचिन इंगळे,केशव कापले,अमर पिंपळेकर,प्रताप कदम, संतोष आटोळे,सत्यनारायण शर्मा,प्रफुल कुळकर्णी,मदन गावंडे,सुरेंद्र चव्हाण,श्याम गायगोळ, एजाज देशमुख, पंकज तेरवाडीया,धनंजय वानखडे,सुरेश बोरकर,सतिष तिवारी,मुन्ना बोंद्रे, अजय खोद्रे, निखील देशमुख,दिनेश बोराडे,चंद्रसिंग बोराडे,प्रकाश बोराडे,जग्गु इंगळे,मुकुंदसिंग इंगळे,राहुल पाटील, मोहन पवार,जुलालसिंग पवार यांच्यासह सकल राजपुत समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments