Advertisement

वनव्यांनी होत आहे सातपुड्याची होळी 2 *अवैध डिंक काढणाऱ्यांचा आगी लावण्याचा सपाटा 3 *2 आरोपी ताब्यात तर एक कोर्टासमोर

*वनव्यांनी होत आहे सातपुड्याची होळी *अवैध डिंक काढणाऱ्यांचा आगी लावण्याचा सपाटा *2 आरोपी ताब्यात तर एक कोर्टासमोर
जळगाव जामोद दिनांक 1 तालुक्यातील जळगाव जामोद वन विभाग अंतर्गत उंबरदेव ते कुवरदेव ह्या अतिशय महत्त्वाच्या व आंबाबरवा वन्यजीव अभयारण्य ह्या व्याघ्र बहुल जंगलाच्या शेजारी असलेला सातपुडा ची वने सध्या वनव्यांनी धगधगत असून वनसंपत्तीची व वन्यजीवांची हानी होत आहे . ह्या विषयी अधिक माहिती मिळवली असता कुवरदेव परिसरातील सागवान बहुल परिसरात दि 18 ला लागलेली आग दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत सतत धगधगत होती . तसेच जिल्ह्यातील उंच शिखरांपैकी एक असलेले ढोरमाऱ्या च्या मागच्या बाजूला भिंगारा पश्चिम या बीटमध्ये दिनांक 27 मार्चला ला संध्याकाळ पासून वनवा धगधगत होता, या वनव्यांमुळे अमूल्य असा वनसंपत्ती व वन्यजीवांचा ठेवा नष्ट होत आहे त्याचप्रमाणे प्रकृतीला नुकसान होऊन प्रदूषण ही वाढत आहे वनविभागाच्या दुर्लक्ष व वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे सदर वनवे लागल्याचे तालुक्यातील चित्र आहे. ह्या विषयी वनविभागाशी संपर्क साधला असता बऱ्याचदा ही आग आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे उत्तर मिळाले तर काही वेळा आम्ही विझवत असल्याचा माहिती प्रभारी वनक्षेत्र अधिकारी यांनी फोनवरून दिली. त्याचप्रमाणे मागील आठवड्यापासून दररोज रात्री तालुका भरातून सातपुड्याच्या विविध भागांमध्ये आगी दिसत असल्याच्या दृश्य दिसते. ========= चौकट===== वन गुन्हे पूर्णतः रोखण्यासाठी पूर्णवेळ वनक्षेत्र अधिकारी ची व वन विभागातील रिक्त पदे भरण्याची जळगाव जामोद वन कार्यालयाला गरज! जळगाव जामोद तालुक्यातील वनहद्दीमध्ये सध्या सर्वच वनगुन्हे थोडाफार प्रमाणात चोरीछुपे सुरू असून यामध्ये प्रामुख्याने गौण खनिज चोरी व अवैध गौण खनिज वाहतूक, अंजनपाला तस्करी ,सागवान कटाई ,अवैध सागवान चोप वाहतूक ,तालुका भर हिरवे कडूनिंब ,बाभूळ व चिंच वृक्ष कटाई करून वाहतूक , जंगलास आगी लावणे ,अवैध चराई, काही ठिकाणी अतिक्रमणे व असे अनेक वनगुन्हे रोखणे हे वनविभागासमोरील मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तालुक्यातील वनांचा विस्तार बघता इथं पूर्णवेळ अधिकाऱ्याची व पुरेशा कर्मचाऱ्यांची गरज असून सुद्धा सध्या खामगाव येथून प्रभारी अधिकारी हा कारभार पाहत आहे तसेच कर्मचाऱ्यांची संख्या ही तुटपुंजि ठरत असून त्यामुळे तालुक्यातील पर्यावरण धोक्यात आले आहे. ==================== ह्या लागणाऱ्या आगी ह्या फेब्रुवारी महिन्यापासून दरवर्षी लागत असून आता याचे प्रमाण जास्तच वाढले आहे या वनव्यांच्या आणखी मुळाशी जाऊन माहिती काढली असता ह्या आगी काही गुन्हेगार डिंक काढण्यासाठी लावत असल्याचे उघडकीस येत आहे. सालाई व इतर काही वृक्षांना बुडाशी कुऱ्हाडीचे घाव मारून त्या परिसराला आग लावल्या जाते. त्यामुळे त्या घावातून डिंक निघतो असा त्या गुन्हेगारांचा समज आहे. याच पद्धतीने परिसरातील कड व धावडा अशी गोंद उत्पादनासाठी महत्त्वाची झाडे या गुन्हेगारांनी नष्ट केल्याचे वृद्ध मंडळी सांगतात . ह्या प्रकरणी दोन आरोपींना वन विभागाने ताब्यात घेतले असल्याचे माहिती मिळाली. तसेच हा अवैध गोंद विकत घेणारा एक व्यापारी सुद्धा वन विभागाने कोर्टासमोर उभा केला असल्याचे कळते. ह्या अवैध डिंकाला सध्या 90 रु प्रति किलो हा भाव हे अवैध व्यापारी देत असल्याचे कळते. डिंकाचा हा धंदा न थांबल्यास, अशाच पद्धतीने जंगलांना आगी लावून वनसंपत्ती नष्ट करणे सुरू राहिले तर मुक्ताईनगर ,यावल व आंबाबरवा ह्या प्रमुख जंगलांना जोडणारा हा सातपुड्याचा उंबरदेव ते कुवरदेव जोडमार्ग मधील जंगल नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे.*वनव्यांनी होत आहे सातपुड्याची होळी *अवैध डिंक काढणाऱ्यांचा आगी लावण्याचा सपाटा *2 आरोपी ताब्यात तर एक कोर्टासमोर जळगाव जामोद दिनांक 1 तालुक्यातील जळगाव जामोद वन विभाग अंतर्गत उंबरदेव ते कुवरदेव ह्या अतिशय महत्त्वाच्या व आंबाबरवा वन्यजीव अभयारण्य ह्या व्याघ्र बहुल जंगलाच्या शेजारी असलेला सातपुडा ची वने सध्या वनव्यांनी धगधगत असून वनसंपत्तीची व वन्यजीवांची हानी होत आहे . ह्या विषयी अधिक माहिती मिळवली असता कुवरदेव परिसरातील सागवान बहुल परिसरात दि 18 ला लागलेली आग दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत सतत धगधगत होती . तसेच जिल्ह्यातील उंच शिखरांपैकी एक असलेले ढोरमाऱ्या च्या मागच्या बाजूला भिंगारा पश्चिम या बीटमध्ये दिनांक 27 मार्चला ला संध्याकाळ पासून वनवा धगधगत होता, या वनव्यांमुळे अमूल्य असा वनसंपत्ती व वन्यजीवांचा ठेवा नष्ट होत आहे त्याचप्रमाणे प्रकृतीला नुकसान होऊन प्रदूषण ही वाढत आहे वनविभागाच्या दुर्लक्ष व वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे सदर वनवे लागल्याचे तालुक्यातील चित्र आहे. ह्या विषयी वनविभागाशी संपर्क साधला असता बऱ्याचदा ही आग आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे उत्तर मिळाले तर काही वेळा आम्ही विझवत असल्याचा माहिती प्रभारी वनक्षेत्र अधिकारी यांनी फोनवरून दिली. त्याचप्रमाणे मागील आठवड्यापासून दररोज रात्री तालुका भरातून सातपुड्याच्या विविध भागांमध्ये आगी दिसत असल्याच्या दृश्य दिसते. ========= चौकट===== वन गुन्हे पूर्णतः रोखण्यासाठी पूर्णवेळ वनक्षेत्र अधिकारी ची व वन विभागातील रिक्त पदे भरण्याची जळगाव जामोद वन कार्यालयाला गरज! जळगाव जामोद तालुक्यातील वनहद्दीमध्ये सध्या सर्वच वनगुन्हे थोडाफार प्रमाणात चोरीछुपे सुरू असून यामध्ये प्रामुख्याने गौण खनिज चोरी व अवैध गौण खनिज वाहतूक, अंजनपाला तस्करी ,सागवान कटाई ,अवैध सागवान चोप वाहतूक ,तालुका भर हिरवे कडूनिंब ,बाभूळ व चिंच वृक्ष कटाई करून वाहतूक , जंगलास आगी लावणे ,अवैध चराई, काही ठिकाणी अतिक्रमणे व असे अनेक वनगुन्हे रोखणे हे वनविभागासमोरील मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तालुक्यातील वनांचा विस्तार बघता इथं पूर्णवेळ अधिकाऱ्याची व पुरेशा कर्मचाऱ्यांची गरज असून सुद्धा सध्या खामगाव येथून प्रभारी अधिकारी हा कारभार पाहत आहे तसेच कर्मचाऱ्यांची संख्या ही तुटपुंजि ठरत असून त्यामुळे तालुक्यातील पर्यावरण धोक्यात आले आहे. ==================== ह्या लागणाऱ्या आगी ह्या फेब्रुवारी महिन्यापासून दरवर्षी लागत असून आता याचे प्रमाण जास्तच वाढले आहे या वनव्यांच्या आणखी मुळाशी जाऊन माहिती काढली असता ह्या आगी काही गुन्हेगार डिंक काढण्यासाठी लावत असल्याचे उघडकीस येत आहे. सालाई व इतर काही वृक्षांना बुडाशी कुऱ्हाडीचे घाव मारून त्या परिसराला आग लावल्या जाते. त्यामुळे त्या घावातून डिंक निघतो असा त्या गुन्हेगारांचा समज आहे. याच पद्धतीने परिसरातील कड व धावडा अशी गोंद उत्पादनासाठी महत्त्वाची झाडे या गुन्हेगारांनी नष्ट केल्याचे वृद्ध मंडळी सांगतात . ह्या प्रकरणी दोन आरोपींना वन विभागाने ताब्यात घेतले असल्याचे माहिती मिळाली. तसेच हा अवैध गोंद विकत घेणारा एक व्यापारी सुद्धा वन विभागाने कोर्टासमोर उभा केला असल्याचे कळते. ह्या अवैध डिंकाला सध्या 90 रु प्रति किलो हा भाव हे अवैध व्यापारी देत असल्याचे कळते. डिंकाचा हा धंदा न थांबल्यास, अशाच पद्धतीने जंगलांना आगी लावून वनसंपत्ती नष्ट करणे सुरू राहिले तर मुक्ताईनगर ,यावल व आंबाबरवा ह्या प्रमुख जंगलांना जोडणारा हा सातपुड्याचा उंबरदेव ते कुवरदेव जोडमार्ग मधील जंगल नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे.

Post a Comment

0 Comments