Advertisement

खामगाव उपविभागीय अधिकारी डॉ.* *रामेश्वर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण

*खामगाव  उपविभागीय अधिकारी डॉ.* *रामेश्वर पुरी यांच्या हस्ते* **ध्वजारोहण* 
खामगाव, दि. १ मे २०२६ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा वर्धापन दिन खामगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आज सकाळी ८ वाजता शासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
उपविभागीय अधिकारी मा. डॉ. रामेश्वर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

समारंभास उपविभागीय कृषी अधिकारी बी. जी. व्यवहारे तहसिलदार सुनिल पाटील,तालुका कृषी अधिकारी सुनिल पवार,नायब तहसिलदार अभिजीत जोशी, नायब तहसिलदार शिरीष वसावे, नायब तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार निखिल पाटील, नायब तहसिलदार सोनाली भाजीभाकरे, निरीक्षण अधिकारी रोशनी फुलझेले, अनिल खिराडे माजी सैनिक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून, समारंभ राष्ट्रगीताने संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments