Advertisement

सुनगाव ग्रामपंचायत चा बेजबाबदारपणा नदीपात्रालाच बनविले डम्पिंग ग्राउंड

सुनगाव ग्रामपंचायत चा बेजबाबदारपणा नदीपात्रालाच बनविले डम्पिंग ग्राउंड
गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुनगाव ग्रामपंचायत चा बेजबाबदार पणा निदर्शनास आला आहे ग्रामपंचायतला दोन ते तीन वर्षांपूर्वी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी मिळालेली आहे गावातील व परिसरातील केरकचरा ही सफाई कामगार यांच्यामार्फत कचरा गाडीमध्ये जमा करून तो केरकचरा वेगळा इ क्लास जमिनीवर न टाकता गावा जवळील नदी पात्रातच टाकला जात आहे त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे या कचऱ्या मध्ये प्लास्टिक पिशव्या तसेच दवाखान्यातील स्क्रॅप मटेरियल जसे प्लास्टिक इंजेक्शन सुया इत्यादी केरकचरा यामध्ये असतो त्यामुळे हा कचरा नदीपात्रात टाकल्यामुळे सदर नदीपात्र हे दूषित करण्याचे काम सुनगाव ग्रामपंचायत ने केलेले आहे काही दिवसानंतर पावसाळा आल्या नंतर हा केरकचरा नदीपात्रातील पाण्यात पसरून पाणी पिण्यासाठी जाणारे गुरे ढोरे यांना या प्लास्टिक व इंजेक्शन सुई पिशव्या एन पासून यांच्या जीवनाला धोका निर्माण होणार आहे हे नाकारता येत नाही सुनगाव ग्रामपंचायत ला ई क्लास जमीन असताना सुद्धा हा गावातील केरकचरा गोळा करून या जमिनीवर का टाकला जात नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे व एक प्रकारे सुनगाव ग्रामपंचायत ही प्रदूषणाला आमंत्रणच देत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही तरी पंचायत समिती प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे

Post a Comment

0 Comments