शिवाजी महाराजांच्या फोटोची मोबाईलवर आक्षेपार्ह पोस्ट वायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल...
जळगांव जा.प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज आई भवानीकडून नव्हे तर टिपू सुलतानकडून तलवार घेत असल्याच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याप्रकरणी शेख आबीद शेख शफीक रा. जळगाव जामोद याचेविरुद्ध अपराध नंबर ३०९/२३ कलम २९५ भादंवी नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.सदर पोस्ट प्रकरणाची तक्रार रितेश डोबे यांनी जळगांव पोलीस स्टेशनला दिल्याने या युवकावर कारवाई करण्यात आली आहे. याने शिवाजी महाराजांचा मूळ फोटो एडिट करून आई भवानीच्या जागी टिपू सुलतानचा फोटो टाकला. शिवाजी महाराज खाली घुटने टेकवून टिपू सुलतानकडून तलवार घेत आहेत. असा फोटो एडिट करून त्याचे मोबाईलवर त्याने स्टेटस ठेवत शिवाजी महाराजांच्या फोटोची विटंबना केली व दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावरून अटकेची कारवाई करण्यात आली.पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय अमोल पंडित करीत आहे...
0 Comments