Advertisement

उपविभागीय कार्यालया समोर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने धरणे आंदोलन

उपविभागीय कार्यालया समोर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने धरणे आंदोलन
प्रतिनिधी जळगाव जामोद 
जळगाव जामोद दि 21:उप विभागीय कार्यालया समोर महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण समितीचे दोन दिवसीय धरणे आंदोलनआज दिनांक 21 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे
 सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा बांधव ओ.बी.सी. मध्ये सरसकट कुणबी आरक्षण (ओ.बी.सी.) मागत आहेत. व त्यावर सरकार निरनिराळी आश्वासने देऊन कुणबी प्रमाणपत्र देत आहेत. ओ.बी.सी आरक्षण बचाव समिती शासनाच्या हया कृतीला विरोध करत असून 
 मराठा बांधवांना आरक्षण द्या, पण ओ.बी.सी. मधून नको.
ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला दिलेली खोटी ओ.बी.सी. प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावी
व नियमानुसार जातपडताळणी करण्यात यावी. मंडल आयोग, नच्चीपन समिती, आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तात्काळ
लागू करण्यात याव्यात. ह्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्यओबीसी आरक्षण बचाव समिती ता. जळगांव जा. जि.बुलडाणा यांच्यावतीने आज दिनांक 21 नोव्हेंबर व 22 नोव्हेंबर रोजीदोन दिवसीय धरणे आंदोलन करीत आहेत यावेळी समिती अध्यक्ष ओ. पी. तायडे, कार्याध्यक्ष रघुनाथ कालकार, कार्याध्यक्ष राजेश लहासे, सरचिटणीस श्यामभाऊ इंगळे, उपाध्यक्ष गुलाबराव इंगळे, विजय पोहनकार सोपान गोंड सुनील भगत, सुधीर दाते कोषाध्यक्ष विजय म्हसाळ, सचिव सुनील धनभर कार्यकारणी सदस्य जयदेव वानखडे, महेंद्र बोडके, सचिन बुंदेले, महादेव वानखडे, दिलीप बाभुळकर, पुंजाजी ताडे, देविदास खेडेकर, अशोक गोरडे, स्वप्निल वानखडे, विधी सल्लागार एडवोकेट संदीप मानकर, प्रचिती प्रमुख काशिनाथ मानकर, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून धरणे आंदोलन सुरू केले

Post a Comment

0 Comments