Advertisement

संतनगरी मुंडगावात रंगला अनाथ मुलींच्या अतुट नात्यांचा भाऊबीज सोहळा समीर वानखेड़े व क्रांती रेडकर यांची उपस्थिती

संतनगरी मुंडगावात रंगला अनाथ मुलींच्या अतुट नात्यांचा भाऊबीज सोहळा समीर वानखेड़े व क्रांती रेडकर यांची उपस्थिती
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
 दि १९ नोव्हेंबर २०२३रविवार श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथे अनाथ मुलींची दिवाळी भाऊबीज साजरी करण्यात आली. 
 श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथे दर वर्षीप्रमाणे या वर्षी गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशु गृह अकोला येथील अनाथ मुला मुलींना "संतांचे दर्शन घेवू या, मामाच्या गावाला जावु या" या घोषनेत वाहन पाठवून आमंत्रित केल्या गेले. मुंडगावातील सर्व गावकर्‍यांनी गावच्या वेशीवर बालीकांच्या स्वागताकरीता उभे होते . नंतर ढोल ताशांच्या गजरात मुलींना पादुका संस्थान मध्ये आणल्या गेले. नंतर बालींकांचे पाय धुवुन पूजन केले. दोन्ही वेळा मिष्टान्न भोजन व्यवस्था केली गेली . यावेळी संध्याकाळी ४ वाजता भाऊबीज ओवाळणी कार्यक्रमात, दानशूर भक्तांनी आणलेल्या भेट वस्तू, नविन कपडे, स्वेटर, ब्लॅन्केट, नित्य उपयोगी वस्तू, फराळाचे डब्बे देण्यात आले. 
     या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री समिरजी वानखेडे, सहआयुक्त, भारतीय महसूल सेवा,विशेष उपस्थितीत प्रसिद्ध अभिनेत्री मा. क्रांतीताई रेडकर वानखेडे, ज्ञानदेव वानखेडे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर राठोड, कुलसचिव डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रमुख अतिथी अकोट, ज्ञानेश्वर रुद्रकार गटविकास अधिकारी प. स. अकोट, रमेशजी थोरात, संस्थापक अध्यक्ष निळूफुले फॉउंडेशन, सुधाकरजी गिते, महाराष्ट्र राज्य, नाट्य परीक्षण समिती सदस्य, सौ मिरा जोशी, संचालिका गायत्री बालिकाश्रम, अनिलसेठजी अग्रवाल संचालक, जनता कमर्शियल बॅंक, अकोला, हे लाभले . 
  यावेळी सौ वर्षा पन्नासे लिखीत, संदिप भुरे बिड यांनी संगीतबद्ध केलेले व प्रसिद्ध सिने पार्श्व गायिका वैशाली सामंत यांनी गायलेल्या गिताचे विमोचन क्रांती रेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी वैषाली सामंत यांनी व्हीडिओ द्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. 
  याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सौ वर्षा पन्नासे, सौ रेवतीताई अढाऊ, मुख्याध्यापिका किड्स प्लानेट स्कूल अकोट, श्रीमती सुनीताताई भिरडे, व मनीष मोडक, अध्यक्ष श्री क्षेत्र पानेट यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाला विनोद अग्रवाल, श्री गजानन महाराज हिरुळकर, मनिष अढाऊ सर, व शेकडो गावकरी उपस्थित होते. 
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थानचे कोषाध्यक्ष विजय ढोरे यांनी केले, संचालन कु. मोनिका काळेनी केले. 
   या अनाथ मुलींच्या दिवाळी भाऊबीज सोहळ्याकरीता ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे श्री गजानन महाराज पादुका संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विलास बहादुरे, उपाध्यक्ष गणेश ढोले, सचिव शरद सोनटक्के, व्यवस्थापक महेश गाढे, कोषाध्यक्ष विजय ढोरे, विश्वस्त गणेश कळसकर, ज्वारसिंग आसोले सल्लागार समिती, व भाऊबीज सोहळा व्यवस्थापन समितीचे डॉ सुभाष रोठे, अशोक बेलसरे, छगन अंबळकार, ठाकरे गुरुजी, वैभव कुबेटकर, श्री प्रशांत आकोते, श्री शुभम हाडोळे, जनार्दन खलोकार, श्री नितीन गणगणे, श्री दिपक सापधारे ,व गावकऱ्यांकडुन आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments