महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जामोद शहर अध्यक्ष नागेश हटकर यांनी 8/8/ 2024 रोजी उपवनसंरक्षक अधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले होते दिलेल्या असे नामुद करण्यात आले होते की जळगाव जामोद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेंढी चराई तसेच अवैध वृक्षतोड होत असल्याने सातपुडा पर्वतामधून काही वनस्पती नष्ट होत आहेत तसेच जळगाव जामोद तालुका अंतर्गत येतअसलेल्या सातपुडा पर्वता मध्ये नवीन वृक्ष लागवड झालेली असून मेंढ्या चराईमुळे नवीन झाडाचे रोपटे नष्ट होत आहेत या संदर्भात तोंडी माहिती देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी कोणती दखल घेत नाही याची आपण चैकसी करावी
तसेच जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वन जमिनीवर अतिक्रमण झालेले दिसून येत आहे तसेच आरामसीनवर सर्रास अवैधा आडजात लाकूड कटाई चालू आहे रंदा मशीनवर सुद्धा विनापरवाना कटलेला लाकडाचे काम चालू आहे मध्यरात्रीच्या वेळेत अकोट बावनबीर चांगेफळ तेल्हारा जळगाव जामोद देणारा या सर्व ठिकाणच्या आरा मशीन वरून अवैध कटाई केलेले अडजात लाकूड जीगाव टाकळी प्रकल्पामध्ये घरें बनवण्याकरिता ट्रक भरून नेलं जात आहे लाकडाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केल्या जात आही तसेच जळगाव जामोद वरील वन विभागाच्या नाक्यावरून मध्यप्रदेश मध्ये सुद्धा ट्रक भरून अवैध आडजात लाकूड मध्यरात्रीच्या वेळी पाठवल्या जातात या सर्व बाबींची चौकशी करून कार्यवाही करावीं त्यांच्यावरती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 14/8/2024 पासून आपल्या कार्यालयासमोर गांधीगिरी मार्गाने उपोषण करण्यात येईल याची सर्व जबाबदारी आपल्या कार्यालयाचे राहील मात्र दिलेल्या निवेदनाची दखल ना घेतल्यामुळे आज दिनांक 14 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे शहर अध्यक्ष नागेश भटकर यांनी उपोषणास सुरुवात केली आहे
0 Comments