Advertisement

कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयामध्ये एड्स जनजागृती व रांगोळी स्पर्धेचे आयोजन

*कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयामध्ये  एड्स जनजागृती व रांगोळी स्पर्धेचे आयोजन* 
स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद येथे आज दि.14/08/2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून एड्स तसेच अँटी रॅगिंग बाबत समाजामध्ये व महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्याकरिता रांगोळी, चित्रकला व पोस्टर निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.स्वातीताई वाकेकर यांच्या शुभहस्ते झाले.

सदर स्पर्धेमध्ये दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी रांगोळी चित्रकला व पोस्टर या माध्यमातून एड्स बद्दल समाजात कशाप्रकारे जनजागृती करता येईल तसेच एड्सग्रस्त व्यक्तींकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलणे अत्यंत आवश्यक आहे, याचे जिवंत चित्र रेखाटले तसेच अँटी रॅगिंग हा शैक्षणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. याबाबत सुद्धा विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे आपली मते पोस्टरच्या माध्यमातून मांडली व त्या अनुषंगाने महाविद्यालय स्तरावर याबाबत सर्वांनी एकत्रितपणे सहभाग नोंदवून रॅगिंग मुक्त परिसर कसा निर्माण होईल याकरिता सर्वांनी कठोर पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉ.स्वातीताई वाकेकर यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर, चित्र व रांगोळी यांची पाहणी करून विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली तसेच स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व मोलाचे मार्गदर्शन सुद्धा केले.

कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई तसेच उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल तायडे आणि कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे व डॉ.अनिकेत उमाळे आणि प्रा.कू.नम्रता खीरोडकर यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments