घरकुल यादीत नाव समाविष्ट करा या मागणीसाठी ग्रामपंचायत सुनगांव येथे आमरण उपोषण
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव ग्रामपंचायत समोर गावातील काही नागरिकांनी घरकुल यादीमध्ये नाव समाविष्ट करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे
सुनगांव येथील उपोषण कर्ते मोहनसीह फकीर चंदसिह राजपूत सुरेश भिकाजी जोशी अरुण रामलाल दुबे यांनी दिनांक17जानेवारी 2025 रोजी घरकुल यादी मधून वगळण्यात आलेले नावे यादीमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात यावी या मागनीचे निवेदन सुनगाव ग्रामपंचायत व गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद याना दीले होते परंतु त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता येतील नागरिकांना घरकुलाच्या लाभावापासून मुकावे लागणार आहे ग्रामपंचायत कार्यालयातील जुन्या घरकुल यादीया उपोषण कर्त्याची नावे समाविष्ट असून आता नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या घरकुल यादी मधून या लाभार्थ्यांची नावे रद्द करण्यात आली आहे याविषयी उपोषणकर्त्यांनी ग्रामसेवक व ग्रामपंचायत सरपंच यांना याबाबत वेळोवेळी विचारणा केली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी हितेंद्र जोशी यांनी आपली नावे सिस्टीम अंतर्गत रद्द करण्यात आल्याचे सांगितले
त्यामुळे मोहनसिंह राजपूत सुरेश जोशी अरुण दुबे यांनी आपली नावे घरकुल यादीत समावेश करुन घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी 10 मार्च पासून आमरण उपोषणाला बसले आहेत
या उपोषणाला सरपंच रामेश्वर अंबळकार ग्रामपंचायत सदस्य बळीराम घुळे ग्रामपंचायत सदस्य गजानन दातीर रामेश्वर केदार रमेश वंडाळे विष्णू येऊल प्रमोद वानखेडे तंटामुक्ती अध्यक्ष शालीग्राम भगत रामेश्वर ठोसर अमोल येऊन सुनील भगत रमेश कोथळकार लक्ष्मण काटोले गणेश अंबळकार वसंत ताळे यांनी भेटी देत उपोषणाला आपला पाठिंबा दिला
प्रतीक्रीया
उपोषण करते मोहन सिंह राजपूत व गावकऱ्यांच्या घरकुल प्रश्नी पंचायत समितीस्तरावर पाठपुरावा करून सदर उपोषणकर्त्याची नावे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार व उपोषण करते व अन्य गावकरी यांना घरकुलाचा लाभ मिळवून देणार
रामेश्वर अंबळकार सरपंच ग्रामपंचायत सुनगांव
0 Comments