जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी:-
रविवार 9 मार्च ला सांस्कृतिक भवन जळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
सलग तीन वर्षापासून सुरू असलेला सन्मान नारीशक्ती कार्यक्रम जळगाव जामोद मध्ये विनोद वानखडे आयोजन करत असतात 2023 पासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली पहिल्या वर्षी मेधाताई पाटकर नर्मदा बचाव आंदोलन प्रणेते यांच्या हस्ते 55 महिलांना सन्मानित करण्यात आले यामध्ये सर्व क्षेत्रातील जे राजकीय सामाजिक नोकर पेशा आणि कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला दुसऱ्या वर्षी शुभदा ताई देशमुख गडचिरोली व यामिनीताई चौधरी पुणे यांच्या हस्ते 45 महिलांना सन्मानित करण्यात आले यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मोना चिमोटे व डॉक्टर लताताई भोसले बाहेकर बुलढाणा यांच्या हस्ते 40 महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकर्त्या जिजा ताई राठोड चांदेकर ह्या राहणार आहेत तर प्रमुख उपस्थितीमध्ये जयश्रीताई शेळके वृषालीताई बोंद्रे रेश्मा ताई हिवाळे सीमाताई वानखडे यांचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विनोद वानखडे सह भाऊ भोजने अभय मारोडे विजय पोहनकर मीनाताई सातव वेति ताई शेवोकार जी के मोरे मिलिंद वानखडे यांचा सहभाग आहे
0 Comments