Advertisement

पदभार घेताच जळगाव जामोद तालुक्यात आयपीएस डॉ .श्रेनिक लोढा यांच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी...२५ लाखाच्या गुटख्यासह तीन आरोपी जेरबंद

पदभार घेताच जळगाव जामोद तालुक्यात आयपीएस डॉ .श्रेनिक लोढा यांच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी...२५ लाखाच्या गुटख्यासह तीन आरोपी जेरबंद

अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्यानंतर नव्यानेच रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक आयपीएस अधिकारी डॉ.श्रेनिक लोढा यांच्या पथकाने जिल्ह्यात धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. पदभार स्वीकारताच दिनांक १५ मार्च च्या संध्याकाळी जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगाव गावामधुन जामोद कडे जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित अवैध गुटख्याचे वाहन पथकाने पकडून वाहनासह ३४ लक्ष ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक आयपीएस डॉ.श्रेनिक लोढा यांनी पदभार स्वीकारताच जिल्हाभरात अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असल्याचे समजते.आयपीएस डॉ श्रेनिक लोढा यांच्या पथकाला जळगाव जामोद येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जळगाव जामोद ते जामोद रोड वरील सुनगांव येथे नाकाबंदी केल्यानंतर भरधाव वेगात येणारे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच ३०  बिडी ५५४६ अडविले व झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू ने भरलेले कट्टे मिळून आले. यामध्ये ५६ हजार २५० किमतीचे पानबहार ,१लाख ८ हजार किमतीचे प्रीमियम झेड एल प्रत्येकी रुपये ४८ किमतीचे,४४ हजार रुपये किंमतीचे प्रिमीअम राज निवास सुगंधित पान मसाला, ४४ हजार रुपये किमतीचे व्ही-१ सुगंधी तंबाखू,३ लाख ९६ हजार किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला,१५ हजार रुपये किमतीचे व्हि-१ सुगंधीत तंबाखू, २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला प्रत्येकी रुपये ४७० किमतीचे,२३ हजार ४०० रुपये किमतीचे व्हि-१ सुगंधित तंबाखू प्रत्येकी रुपये ३० किमतीचे,१ लाख १७ हजार किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला प्रत्येकी रुपये १५० किमतीचे, २ लाख ४० हजार २४० किमतीचे व्हि-१ सुगंधी तंबाखू प्रत्येकी रुपये ३३ किमतीचे ७२८० पॅकेट्स, १३ लाख ६१ हजार ३६० किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला प्रत्येकी १८७ किमतीचे प्रत्येकी २२ पाऊचेसच्या ७२८० पॅकेट असा एकूण प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू किंमत २५ लाख ४२ हजार २५० तर वाहन किंमत ९ लाख रुपये असा एकूण ३४ लाख ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल व तीन आरोपी आयपीएस डॉ.श्रेनिक लोढा यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सदर घटनेची तक्रार अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे गुलाबसिंग कीर्ता वसावे यांनी दि १६ मार्च रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम राजू भउटे वय २४ वर्ष राहणार लाडणापूर तालुका संग्रामपूर, राहुल दिलीप जयस्वाल वय ३४ वर्ष राहणार शिरसोली तालुका तेल्हारा जिल्हा अकोला, प्रवीण सुनील मुर्खे वय २३ वर्ष राहणार लाडणापुर तालुका संग्रामपूर यांच्या विरोधात अप क्र.१५४/२०२५ कलम २२३,२७४,२७५,१२३ भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम २६(२)(I),२६(२)(iv),२७(३)(d),२७(३)(e),३(१)(zz)(iv)५९ अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना दिनांक १८ मार्च २०२५ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments