Advertisement

खामगाव अर्बन बँक च्या वतिने' 'भारत गौरव ' देविदास शर्मा यांचा सत्कार*खामगांव /(संतोष आटोळे)

*खामगाव अर्बन बँक च्या वतिने' 'भारत गौरव ' देविदास शर्मा यांचा सत्कार*
खामगांव /(संतोष आटोळे)
      खामगाव येथील सतिफैल परीसरातील धार्मिक सामाजिक कार्यात सदा अग्रस्थानी असणारे गोर गरीबाची सेवा करणारे अगदी साधी राहणी मान व उच्च विचार असणारे श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांच्या मार्गदर्शना खाली मागिल 26 वर्षा पासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ, पारदर्शक, योग्य नियोजन करून उपक्रम राबविले जात आहे.देविदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जात असुन त्यांना भारत गौरव सर्वोच्च संम्मान, महाराष्ट्र भुषण, विश्वकर्मा समाज रत्न,बहुजन महाराष्ट्र रत्न, छत्रपती शाहु महाराज जिवन गौरव, इंडियन एक्सलेंन्स अवार्ड, नॅशनल आयकॉन अवार्ड,राष्ट्रहित सेवा गौरव व अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या संम्मानाबद्दल त्यांचा धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात सध्या सत्कार होत आहे.भजनी मंडळाच्या माध्यमातून खामगाव शहराचे नाव पुर्ण भारतात जात आहे त्या निमित्त दि ६ मार्च शुक्रवार रोजी खामगांव अर्बन बँक. दत्त उपासक मंडळाच्या वतीने 
देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांचा शाल. पुष्पगुछ देऊन  सत्कार करण्यात आला या प्रंसंगी खामगाव अर्बन बॅकेचे अध्यक्ष प्रा विजयजी पुंडे सर, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर जी जाधव,मुख्य व्यवस्थापक संतोष जाधव, बोर्ड सचिव राजु जुनारे, संजय गुरव, चितारे सर, किरण रेठेकर, अभय दिढे, हरिदास उज्जैनकर, निखिल देशपांडे, तेहरसिग भिलाला, प्रकाश सोनोने, गजानन म्हात्रे, प्रकाश कळसकर,रुपेश ठोंबरे व कर्मचारी वृंद

उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन किरण रेठेकर यांनी तर आभार प्रदर्शन राजु जुनारे यांनी केले.

Post a Comment

0 Comments