*आदिशक्ती मुक्ताई मंदिरात अंतर्धान सोहळ्याचे आयोजन*
खामगाव (संतोष आटोळे) तालुक्यातील पाळा फाटा येथील आदिशक्ती मुक्ताई मंदिरात आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान सोहळ्यानिमित्त 12 ते 14 मे 26 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दररोज पहाटे चार वाजता विष्णुसहस्त्रनाम पहाटे पाच वाजता काकड सकाळी 11 ते दुपारी एक व दुपारी दोन ते चार या वेळात श्री मुक्ताबाई चरित्र ग्रंथाचे वाचन करण्यात येणार आहे हे वाचन पाळा येथील बंडू महाराज खोमणे करणार आहेत दुपारी पाच वाजता सप्तशती पाठ व हरिपाठ दररोज रात्री आठ ते नऊ या वेळात ह भ प शांताराम महाराज पाळेकर राहणार पाळा यांच्या अमृतवाणीतून कीर्तन आयोजित करण्यात आले आहे 12 मे 26 रोजी शेगाव येथील जितेंद्र सुळ यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे तर 14 रोजी पाळा येथील प्रकाश आटोळे यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
0 Comments