Advertisement

माटरगाव बायपास बस स्टँड जवळ पाणपोई चे उद्घाटन* खामगाव/(संतोष आटोळे)

*माटरगाव बायपास बस स्टँड जवळ पाणपोई चे उद्घाटन*
 खामगाव/(संतोष आटोळे)
      दिनांक 6 मार्च 2026 रोजी प्रवाशांच्या सोयीसाठी आचार्य वेरूळकर गुरुजी यांच्या प्रेरणेने श्रीगुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळाच्या वतीने पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले.
            सर्वप्रथम दिगंबर महाराज पुरी व गोपाळराव मिरगे शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तसेच माजी पंचायत समिती सभापती माधुरीताई मिरगे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

         कार्यक्रम प्रसंगी श्रीगुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळाचे संचालक अनंतराव आळशी, रामभाऊ दळवी,जुगल किशोर गांधी,देविदास जवरे,गोपाळराव मिरगे,शिवशंकर इंगळे, प्रदीप मुंडे,राम देशमुख तसेच गावातील नागरिक भगवान भोजने, सुरेशराव देशमुख, बाळूभाऊ मालठाणे, बाळूभाऊ चरखे,कैलास बोर्डे,नागेश शिंगन, ज्ञानेश्वर लोड, गणेश नागपुरे, बस स्टॉप परिसरातील वाहनांचे वाहन चालक तसेच गावातील लोक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments