*भगवान श्री.परशुराम जन्मोत्सवा निमित्त उद्या भव्य शोभायात्रा*
*व विशाल स्कुटर रॅलीचे आयोजन*
दरवर्षी प्रमाणे यंदाही अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर भ.श्री परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असुन या अनुषंगाने विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात दि. १९ एप्रिल रोजी, भ.परशुराम व्यायाम शाळा येथे, सकाळी ८ वा.भ.परशुराम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पुजन व आरती करून स्कूटर रॅलीला सुरुवात होणार असून सदर स्कूटर रैली शहरातील प्रमुख मार्गानी मार्गक्रमण करीत या स्कूटर रैलीचे समारोप महाराष्ट्रीयन ब्राह्मण सभा रायगढ़ कॉलनी येथे आरतीने होणार आहे, तसेच 11 वाजता वीर हनुमान मंदिर फरशी येथे ब्रह्म मातृशक्ती तर्फे गौ मातेचे पूजन करून गौ ग्रास देण्यात येणार आहे तसेच दुपारी 12 वा .क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले सामान्य रुग्णालय येथे युवा ब्रह्म शक्ती च्या हस्ते रुग्णांना फळ वितरण करण्यात येणार आहे, तदनंतर सायं. 5 वा.स्थानिक सत्यनारायण मंदिर येथून समाजातील जेष्ठ मान्यवरांच्या यांच्या हस्ते विधिवत पुजन व आरती करुन भ.परशुराम यांची भव्य दिव्य शोभायात्रा पारंपारीक वाद्य,अश्व,व आकर्षक रथासह निघणार असुन सदर शोभायात्रा, शिवाजी वेस, सराफा,फरशी, मोहन चौक, महावीर चौक येथून मार्गक्रमण करित सदर शोभायात्रेचे समारोप राजस्थानी ब्राह्मण भवन बारादरी येथे महाआरती व प्रसाद वितरणाने होणार आहे.
तरी स्कुटर रॅलीत समाजातील सर्व तरुण वर्गाने व ब्रह्मवृदांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे तसेच शोभायात्रेत सर्व विप्र बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहुन शोभायात्रा सफल करावी व सर्व ब्रह्म्वृंदांनी आप आपल्या घरासमोर सडा, समर्जन व रांगोळी काढुन शोभायात्रेचे स्वागत करावे.असे आवाहन भ. परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments