Advertisement

. १० जून २०२६ सिंदखेडराजा येथे,हजारोंच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा व सभा संपन्न*खामगांव /(संतोष आटोळे)

*दि. १० जून २०२६ सिंदखेडराजा येथे,हजारोंच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा व सभा संपन्न*
खामगांव /(संतोष आटोळे)
 खामगाव विधानसभेच्या वतीने अँड अमोल अंधारे व राजेंद्र बघे यांचा सक्रिय सहभाग.
संतांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध, दोषींना तात्काळ अटक व मोका अंतर्गत कारवाईची मागणी
सिंदखेडराजा, दि. १० जून २०२६
सिंदखेडराजा येथे गौ सन्मान अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी पूज्य संत श्री बालकृष्ण जी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज हजारोंच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा व निषेध सभा संपन्न झाली. संत समाज, सकल हिंदू समाज, गोभक्त तसेच विविध धार्मिक, सामाजिक व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये संतांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी पूज्य संत श्री बालकृष्ण जी महाराज हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असल्याने सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी आपल्या संदेशाद्वारे सांगितले की, "माझ्यावर झालेला हल्ला हा अत्यंत गंभीर व प्राणघातक स्वरूपाचा होता. या घटनेत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तसेच कटात सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. मला महाराष्ट्र शासन व प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा आहे."
आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य संत श्री विवेकदास जी शास्त्री महाराज (काशी-वाराणसी) यांनी सांगितले की, सिंदखेडराजा येथे झालेला हा निषेध मोर्चा संत समाजाच्या आक्रोशाची केवळ सुरुवात आहे. प्रशासनाने तात्काळ सर्व दोषींना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.

ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्र ही संतांची, महापुरुषांची आणि वारकरी परंपरेची पावन भूमी आहे. अशा भूमीत एखाद्या संतावर हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी आहे. आज तुम्ही संत समाजाच्या उपस्थितीची केवळ झलक पाहत आहात. जर न्याय मिळाला नाही, तर सिंदखेडराजाच्या भूमीवर संत समाजाचा भव्य महाकुंभ भरू शकतो. उत्तर भारतासह देशभरातील संत-महंत, विविध आखाडे, वारकरी संप्रदाय आणि धर्मप्रेमी येथे येऊन न्यायाची मागणी करतील."
स्वामी श्री अमोलनंद सरस्वती महाराज यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायासह तेरा निर्वाणी आखाडा पूज्य संत श्री बालकृष्ण जी महाराज यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराजांना न्याय मिळाला नाही तर संत समाज शांत बसणार नाही.
हिंदुत्ववादी नेते श्री मिलिंद एकबोटे यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, संत-महंत आणि धर्मरक्षकांची भूमी आहे. अशा भूमीत एखाद्या संतावर हल्ला होणे अत्यंत गंभीर बाब आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण मिळता कामा नये. संत श्री बालकृष्ण जी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. संत समाजाच्या न्यायाच्या लढ्याला संपूर्ण हिंदू समाजाचा पाठिंबा आहे.
यावेळी महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे सदस्य श्री उद्धवजी नरेकर यांनी सांगितले की, पूज्य संत श्री बालकृष्ण जी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्र गौ सेवा आयोग तीव्र निषेध करीत असून संत समाजाच्या न्याय्य मागण्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे. गौ संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संतांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. सर्व दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
श्री गजानन महाराज सपकाळ यांनी सांगितले की, संतांवरील हल्ल्यांमुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे. प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता दोषींना अटक करून कठोर शिक्षा सुनिश्चित करावी.
हिंदू सेवक गौरक्षक श्री अमोल अंधारे यांनी सांगितले की, पूज्य संत श्री बालकृष्ण जी महाराज यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका संतावर झालेला हल्ला नसून संपूर्ण संत समाज, गोभक्त आणि हिंदू समाजाच्या श्रद्धेवर झालेला आघात आहे. गौसंरक्षण आणि धर्मजागरणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या संतांवर अशा प्रकारचे प्राणघातक हल्ले होणे अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आवश्यक असल्यास मोका अंतर्गतही कारवाई करून अशा प्रवृत्तींना कठोर संदेश देणे गरजेचे आहे. हिंदू सेवक गौरक्षक संत समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील.
सभेत उपस्थित संत-महंत व मान्यवरांनी एकमुखाने मागणी केली की, या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, निष्पक्ष चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच आरोपींनी संघटित स्वरूपात कायदा हातात घेऊन हिंसक कृत्य केल्याचा आरोप असल्याने, प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक निकष पूर्ण होत असल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA/मोका) अंतर्गत कारवाई करण्याचाही विचार शासन व पोलीस प्रशासनाने करावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी साध्वी गायत्री दीदी, मिलिंद एकबोटे, रूपा गुरु टाकसाळ (किन्नर आखाडा प्रमुख), बाळू महाराज काळे, साधन चैतन्य महाराज, शांतानंद महाराज, शरद जी महाराज, ह.भ.प. गजानन महाराज गायकवाड, साध्वी त्रिवेणी दीदी, रामेश्वर महाराज पवार, श्रावण निळकंठ जी महाराज, गजानन महाराज सपकाळ तसेच विविध आखाडे, वारकरी संप्रदाय, संत समाज, गोभक्त व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच अँड श्री अमोल अंधारे, श्री उज्जवल गव्हाड, श्री शैलेश गोंधणे, श्री प्रवीण अंभोरे, श्री प्रशांत जांबिवाळ, श्री राजेश पिंगळे, श्री राम शर्मा, श्री आदित्य पाटील, श्री रोहित पगारिया, श्री सूरज हनुमंते, अॅड. संदीप मेहेत्रे, श्री अक्षय भोजने, श्री मनोज घाटोळ, श्री शिव ठाकूर, श्री श्रावण निळकंठ, श्री केशवजी महाराज, श्री गोकुलभाई, श्री अशोक अग्रवाल, श्री शरद भाला, श्री ओमप्रकाश गोंधणे, श्री सुनील लाहोटी, श्री प्रेमराजजी भाला, श्री राजू शिंगणे, श्री उद्धवजी नेरकर, श्री सुनील भोजवानी, श्री डॉ. नरेंद्र जोशी (वडनेर) सुशील कोल्हे राजेंद्र बघे अमोल जोशी यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, पूज्य महाराजांनी न्याय मिळेपर्यंत अन्नत्यागाचा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रकृतीची चिंता देशभरातील संत समाजाला लागून आहे. याच कारणामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रातील विविध संप्रदायांचे संत-महंत, वारकरी संप्रदाय, आखाडे आणि धार्मिक संघटनांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
सभेनंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यासह, आवश्यकतेनुसार मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संत समाजाने स्पष्ट इशारा दिला की, न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. संतांचा सन्मान, धर्माची प्रतिष्ठा आणि कायद्यावरील विश्वास अबाधित राखण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा होणे अत्यावश्यक आहे.

Post a Comment

0 Comments