*शिवसेना महिला आघाडी तर्फे माजी मंत्री सुबोध सावजीच्या वक्तव्याचा तीव्र निषेध*
महिलाबद्दल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व नेहमीच अकलेचे तारे तोडणाऱ्या माजी मंत्री सुबोध सावजी यांचा जाहीर निषेध करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडी तर्फे करण्यात आली आहे.
आज दिनांक 17/04/2026 रोजी सुबोध सावजी विरोधात महिलांचा विनयभंग, सार्वजनिक अपमान आणि बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
शिवसेना महिला आघाडी खामगाव तालुका या अर्जाद्वारे सुबोध सावजी (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या विरोधात खालील तक्रार नोंदवत आहे की, दिनांक १६ /०३७ २०२६ "रोजी सुबोध सावजी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालाना उद्देशून एक पत्र लिहिले आहे, जे सध्या सोशल मीडिया आणि विविध वृतवाहिन्यांवर प्रसारित झाले आहे. या पत्रात त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारी विधाने केली आहेत.
सदर पत्रात त्यानी 'स्वतःहून बलात्कार 'करून घेणाऱ्या महिला" असा शब्दप्रयोग केला आहे. भारतीय दंड विधानात (IPC/BNS)'बलात्कार' हा संमतीशिवांय केलेला कृत्य मानला जातो." "स्वतःहून बलात्कार" हीं संकल्पना मांड्न त्यांनी कायद्याचा आणि महिलांच्या वेदनेचा अपमान कला 'आहे. अशा महिलांची नावे, फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी करून त्यांनी महिलांच्या खासगी आयुष्यावर (Right to Privacy) गदा आणली आहे पत्रात महिलांना "व्यभिचारी" आणि "समाजाला कलंक" संबोधून त्यांनी तमाम स्त्री वर्गाचा सार्वजनिक अपमान केला आहे. हे पत्र सार्वजनिक झाल्यामुळे समाजात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित होऊ शकतो आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सावजी यांनी जाणीवपूर्वक महिलांच्या लज्जेचा त्याग होईल असे शब्द वापरले आहेत.
त्यामुळे त्यांच्या वरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
0 Comments