अक्षय तृतीयानिमित्त आज भेंडवळची घटमांडणी; साडेतीनशे वर्षापासून पीक पाण्याचा अंदाज व भाकीत वर्तवणारी परंपरा . सौ गीता सोनोने
आज सायंकाळी या घटाची मांडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे असंख्य शेतकरी व नागरिकांचे लक्ष या मांडणीकडे लागले आहे.
जळगाव (जामोद) ता.१८: गेल्या साडेतीनशे वर्षापासून तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी घट मांडणी द्वारे पीक पाण्याचे भविष्य वर्तवण्यात येते. आज सायंकाळी या घटाची मांडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे असंख्य शेतकरी व नागरिकांचे लक्ष या मांडणीकडे लागले आहे.
तालुक्यातील ग्राम भेंडवळ बु. येथे साडेतीनशे वर्षांपूर्वी रामचंद्र महाराजांनी सुरू केलेली भेंडवळच्या मांडणीची प्रथा आजही कायम असून पीक पाण्याचे, राजकीय आणि आरोग्यविषयक भाकीत वर्तवणारी ही घट मांडणी अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच आज ता.१९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता रामचंद्र महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि त्यांची सहकारी सारंगधर महाराज यांचे हस्ते ही मांडणी घातली आहे.
रामचंद्र महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि त्यांची सहकारी सारंगधर महाराज वाघ हे गावाबाहेरील वाघ यांचे शेतात आज सायंकाळी पाच वाजता ही मंडळी करणार आहेत. तर सायंकाळी केलेल्या मांडणीचे भाकीत उद्या ता.२० एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता जाहीर करण्यात येईल. आज शेतामध्ये घटमांडणी करण्यात येणार आहे. उद्या सकाळी या मांडणीचे अवलोकन करून आणि रामनवमीच्या दिवशी हनुमान मंदिराच्या पारावर केलेल्या मांडणीचे अवलोकन डोळ्यासमोर ठेवून संयुक्तरीत्या अंदाज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे व्यक्त करतील.
गेल्या २० वर्षांतील बदल
ह्या मांडणीसाठी मध्यप्रदेश खानदेश तर संपूर्ण वहऱ्हाड आणि मराठवाड्यातून शेतकरी येथे गोळा होतात. भेडवळ या घटमांडणीतून निष्कर्ष निघाल्यानंतर ह्या वर्षी पर्जन्यमान कसे राहील कोणते पीक कसे येईल याचा अंदाज शेतकरी घेतात व आपल्या खरीप आणि रब्बीचे नियोजन करतात. सध्या हे विज्ञान युग, इंटरनेटची युग आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांचा दृढ विश्वास आजही या मांडणीवर कायम आहे. उद्या ज्यावेळेस घटमांडणीचे भाकीत वर्तवली जाईल. त्यावेळेस विविध बिज उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची प्रतिनिधी यांची लक्षणीय उपस्थिती येथे असते.
0 Comments