Advertisement

खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बहूमताच्या जोरावर बेकायदेशीर ठराव पारीत करण्याचा सत्ताधारी पक्षाचा घाट*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संचालकांचा आरोपखामगांव (संतोष आटोळे )

*खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बहूमताच्या जोरावर बेकायदेशीर ठराव पारीत करण्याचा सत्ताधारी पक्षाचा घाट*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संचालकांचा आरोप
खामगांव (संतोष आटोळे )  खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा दि. 18 एप्रिल 2026 रोजी पार पडली. यासभेमध्ये विषय क्र. 9 वर श्री. मु. शा. भिसे माजी सचिव यांचेबाबत  मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा यांचे पत्रावर विचार करणे, हा विषय ठेवण्यात आलेला होता. सभेमध्ये या विषयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संचालक विलाससिंग इंगळे व गणेश ताठे यांनी लेखी हरकत उपस्थित करीत विरोध दर्शविला. माजी सचिव भिसे यांचेवर अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतांना सुध्दा बहूमताच्या जोरावर सत्ताधारी पक्षाने घाट घालून हा बेकायदेशीर ठराव पारीत केला आहे. यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान होणार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संचालक विलाससिंग इंगळे व गणेश ताठे यांनी केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगांव कृषी बाजार समितीचे वादग्रस्त माजी सचिव मुगुटराव भिसे यांनी पदावर असतांना अनेक गैरप्रकार केलेले असून बाजार समितीच्या आर्थिक नुकसानीबाबत त्यांचेविरुध्द अनेक तक्रारी झालेल्या आहेत.
माजी सचिव भिसे यांनी बाजार समितीची फसवणुक करुन आर्थिक लाभ प्राप्त केला आहे. त्यांंचेविरुध्द झालेल्या खातेनिहाय चौकशी मध्ये श्री. भिसे हे दोषी आढललेले आहेत.  तसेच कोरोना कालावधीतील अन्न-धान्य किट वाटपामध्ये कलम 40 (ब) च्या चौकशीमध्ये सुध्दा माजी सचिव भिसे दोषी आहेत. त्याबाबतचे प्रकरण मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर या ठिकाणी दाखल असून अद्याप प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे माजी सचिव भिसे सेस वसुली बाबतच्या कलम 40 (ब) च्या चौकशीत दोषी आढळले आहेत. त्याबाबतची पुढील कार्यवाही अद्याप प्रलंबीत आहे.
बाजार समितीच्या कोणत्याही कर्मचा¬याविरुध्द चौकशी/प्रकरण प्रलंबीत असल्यास अश्या कर्मचा¬यास बाजार समितीच्या वतीने आर्थिक लाभ देण्यात येत नाही.
मात्र माजी सचिव भिसे यांनी पुन्हा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांची दिशाभुल करुन त्यांचेकडून पत्र मिळवून बाजार समितीकडून आर्थिक लाभ प्राप्त करण्याच्या प्रयत्न केला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या झालेल्या सर्व साधारण सभेत माजी सचिव भिसे यांना कोणतीही रक्कम देण्यापुर्वी त्यांचेवर असलेल्या गंभीर आरोपाबाबत निर्णय अंतीम होईपावेतो त्यांना कोणताही आर्थिक लाभ बाजार समितीच्या वतीने देण्यास संचालक विलाससिंग इंगळे व गणेश ताठे यांनी तीव्र हरकत घेतली. तरी सुध्दा सभापती व त्यांच्या बाजूने असलेल्या संचालकांनी या बेकायदेशीर ठराव पारीत करण्याचा घाट घातला आहे.
विशेष म्हणजे ज्या संचालकांनी या अगोदर माजी सचिव भिसे यांच्या विरोधात सर्व संबंधीतांकडे तक्रारी केल्या होत्या आता तेच संचालक स्वत:च्या तुच्छ स्वार्थासाठी शेतकरी संस्थेची आर्थिक लुट करीत आहेत. या बेकायदेशीर ठरावाची कागदपत्रे मागीतली असून ती मिळाल्यानंतर संबंधीत दोषींविरुध्द आम्ही न्यायालयीन लढा लढू असे संचालक विलाससिंग इंगळे व गणेश ताठे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments