Advertisement

ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव देशमुख यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्षप्रवेश*ना.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल, मुंबई येथील ‘नंदनवन’ या निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा संपन्न.

*ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव देशमुख यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्षप्रवेश*
ना.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल, मुंबई येथील ‘नंदनवन’ या निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा संपन्न.
  शिवसेना युवा नेते ॲड.अमोल अंधारे व शिवसैनिकांकडून सत्कार, तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.
खामगांव /(संतोष आटोळे) गेल्या ४२ वर्षांचा पत्रकारितेचा भक्कम अनुभव आणि २८ पेक्षा अधिक वर्षांचा प्रशासकीय अनुभव असलेले, समाजाभिमुख कार्यातून सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व पंजाबराव माधवराव देशमुख यांनी दि. २१ एप्रिल रोजी मुंबई येथे शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्र राज्याचे संघटन व संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत असलेल्या पंजाबराव देशमुख यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे खामगांव–बुलढाणा जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामीण भागातही समाधान व आनंद व्यक्त होत असून, त्यांच्या या प्रवेशामुळे शिवसेना पक्षाला अधिक बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे.
खामगांव विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यरत असलेले, शिवसेना खामगांव विधानसभेचे BLA-1 प्रमुख तथा युवा नेते ॲड. अमोल अंधारे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक

 स्तरावर पक्षाच्या कार्याला वेग मिळत असून, पंजाबराव देशमुख यांच्या प्रवेशामुळे या कार्याला नवी ऊर्जा व अनुभवी मार्गदर्शन लाभल्याचे बोलले जात आहे.
खामगांव येथे ॲड. अमोल अंधारे यांनी पंजाबराव देशमुख यांचा सत्कार करून शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले की, “पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या अनुभवी, जनसंपर्कात मजबूत आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्वाच्या प्रवेशामुळे शिवसेना पक्षाला मोठी ताकद मिळणार असून त्यांच्या अनुभवाचा लाभ निश्चितच स्थानिक शिवसैनिकांना होईल आणि आपण सर्वजण एकजुटीने पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करूयात.”
सुमारे ४२ वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासात समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडात्मक, सांस्कृतिक तसेच रोजगार, स्वयंरोजगार आणि आरोग्यविषयक विविध प्रश्नांवर सातत्याने लेखन व पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात २८ वर्षांहून अधिक काळ कार्य करताना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवले असून, जनतेच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत त्यांना सखोल जाण आहे. राजकीय घडामोडी, समाजकारण आणि सार्वजनिक धोरण यांचा त्यांनी प्रदीर्घ काळ अभ्यास करत केलेल्या लिखाणामुळे ते या विषयाचे जाणकार अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या व्यापक अनुभवाचा व दांडग्या जनसंपर्काचा लाभ शिवसेना पक्षाला निश्चितच होणार असल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. खामगांव तालुक्यातील सर्वात मोठ्या पिंपळगांव राजा ग्रामीण सर्कलमधून असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या खामगांव येथील निवासस्थानी भेट देत पक्षप्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला असून, या निर्णयाचे स्वागत केल्याचे दिसून आले.
याच पार्श्वभूमीवर पंजाबराव देशमुख यांच्यासमवेत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयरावजी एम.देशमुख (निंबेकर) यांच्या नेतृत्वात संघटनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयजी गायकवाड, शिवसेना पक्षाचे सचिव संजयजी मोरे, शिवसेना बुलढाणा लोकसभा संपर्क प्रमुख संजयजी सोनार, जिल्हाप्रमुख संतोष डीवरे पाटील, युवासेना लोकसभा अध्यक्ष चेतन पाटील घिवे तसेच शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शिवसेना अधिक बळकट होत असून, अशा अनुभवी व्यक्तींच्या प्रवेशामुळे पक्षाच्या कार्याला अधिक चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, ना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष राज्यभर अधिक सशक्त होत असून, खामगांव–बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयातून पक्षाचे बळ अधिक वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Post a Comment

0 Comments