कर्तव्यदक्ष पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे -प्रतीक्षा वासनिक
संकल्प बहुद्देशीय संस्था अकोला यांच्यातर्फे कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शेगांव येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आपल्या कार्यास एकनिष्ठ असणाऱ्या,
सामाजिक, पोलीस, सरपंच,कृषी, क्रीडा, उद्योग, शैक्षणिक, संस्था, प्रशासकीय, कला व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना हा कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा मे महिन्यात शेगांव येथे पार पडणार आहे अशी माहिती कार्यक्रम मुख्य आयोजक प्रतीक्षा वासनिक यांनी दिली. पुरस्कार प्रस्ताव अधिक माहितीसाठी +917385792660 वर सपंर्क करावा असें आवाहन प्रतीक्षा वासनिक यांनी केले आहे.
0 Comments