Advertisement

अपर मुख्य सचिव विकास* *खारगे यांची खामगाव* *उपविभागास भेट; ऑनलाईन* *प्रणालींच्या* *प्रभावी वापरावर भर*

*अपर मुख्य सचिव विकास* *खारगे यांची खामगाव* *उपविभागास भेट; ऑनलाईन* *प्रणालींच्या* *प्रभावी वापरावर भर* 
खामगाव, दि. २४ एप्रिल २०२६ : (उमाका)
राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मा. श्री. विकास खारगे यांनी आज खामगाव उपविभागातील शेगाव व खामगाव येथील विविध महसूल कार्यालयांना भेट देऊन कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी नागरिकांना सेवा देताना ऑनलाईन प्रणालींचा अधिकाधिक व प्रभावी वापर करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
सदर दौऱ्यात मा. खारगे यांनी प्रथम शेगाव येथील तहसील कार्यालय, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तसेच सहनिबंधक कार्यालयाची पाहणी केली. कार्यालयीन कामकाजाची पद्धत, अभिलेख व्यवस्थापन व सेवा वितरण प्रक्रियेचा आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या.
त्यानंतर खामगाव येथे सेतू सुविधा केंद्रास भेट देऊन नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व सेवा प्रदान करताना ऑनलाईन प्रणालींचा कार्यक्षम वापर करून सेवा वेळेत देण्याचे निर्देश दिले. तसेच तहसील कार्यालय खामगाव येथे भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.
उपविभागीय अधिकारी कार्यालय, खामगाव येथे मा. खारगे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील विविध विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महसूल व इतर विभागांच्या कामकाजाची प्रगती, अडचणी तसेच त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तक्रार निवारण प्रक्रियेला गती देणे तसेच सेवा वितरणात पारदर्शकता राखण्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
यानंतर मा. अपर मुख्य सचिव बुलढाणा येथे जिल्हास्तरीय बैठकीसाठी रवाना झाले.
सदर भेटीदरम्यान मा. जिल्हाधिकारी बुलढाणा डॉ. प्रवीण कुमार देवरे, उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद श्री. शैलेश काळे, तहसीलदार खामगाव श्री. सुनील पाटील, तहसीलदार शेगाव श्रीमती प्रज्ञा काकडे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सदर भेटीमुळे प्रशासनाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता व तंत्रज्ञानाधारित सेवा वितरणाला चालना मिळणार असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments