*आता महिला बचत गटांचा भरणारा आठवडी बाजार*
*ना. अँड फुंडकरांची संकल्पना, गुरुवारी उद्घाटन*
*खामगाव* ::- राज्याचे कामगार मंत्री ना. अँड आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून आता दर गुरुवारी महिला बचत गटांच्या उत्पादित मालांचा आठवडी बाजार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदानावर भरवल्या जाणार आहे.
पंडित दीनदयाल नागरी उपजीविका योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या माध्यमातून नगर परिषद खामगाव अंतर्गत स्थापन झालेल्या महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने नगर परिषद खामगावने दर
गुरुवारला महिला बचत गटांचा आठवडी बाजार सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टीने सदर आठवडी बाजारचे उद्घाटन दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी ना.अँड आकाश फुंडकर कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 वाजता,डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान, खामगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सौ. मीनाक्षी वानखेडे, अध्यक्ष आदिशक्ती बचत गट, ह्या असून,प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्षा सौ.अपर्णाताई फुंडकर, उपाध्यक्षा सौ. संतोष पुरोहित,न. प. गटनेते विजय उगले,श्रीमती मोनिका पनपालिया, उद्योजिका, तसेच डॉ. प्रशांत शेळके मुख्याधिकारी हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या खामगाव शहरातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना आपण खरेदी करून भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन नगर परिषद खामगाव तर्फे करण्यात येत आहे.
0 Comments