*"उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीशिवाय थांबू नका!" स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी आवार येथील जिजाऊ ज्युनिअर कॉलेजचा निकाल १००%*
स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते की, "एका वेळी एकच काम करा आणि ते करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात ओता." याच विचाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आवार (ता. खामगाव) येथील जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या परीक्षेत ९3.५० % ते ९०.00 % Pa`aPt 18 ivaVaqaI- यशाचे शिखर गाठले आहे. महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, 20विद्यार्थी 90% वर 180 विद्यार्थी 80% वर विशेष म्हणजे गणितामध्ये शंभर पैकी शंभर मार्क ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या यशामागे संस्थेचे प्राचार्य श्री. सतिश रायबोले यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यांकडून वर्षभर कठोर सराव करून घेतला. परीक्षार्थींना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांच्यातील आत्मविश्वास जागवण्याचे काम शिक्षकांनी केले. स्वामी विवेकानंदांचा विचार की, "जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकणार नाही," हा मंत्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवला, ज्याचा परिणाम निकालात दिसून आला. तसेच संस्था अध्यक्ष श्री. रामकृष्णजी गुंजकर यांची दूरदृष्टी आणि सचिव सौ. सुरेखाताई गुंजकर यांचे खंबीर पाठबळ लाभले आहे. "शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर चारित्र्य घडवणे होय," या विवेकानंदांच्या उक्तीनुसार संस्थेचे कामकाज चालते, असे मत अध्यक्ष महोदयांनी व्यक्त केले. तसेच यशाची परंपरा कायम राखत : वाणिज्य आणि विज्ञान या दोन्ही शाखांत १००% निकाल लागल्यामुळे खामगाव परिसरात 'गुंजकर शैक्षणिक परिवाराचे' कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक आणि आपल्या पालकांना दिले आहे. तसेच अध्यक्ष रामकृष्णजी गुंजकर आणि सचिव सौ. सुरेखाताई गुंजकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, "तुमच्या या यशामुळे केवळ संस्थेचाच नव्हे तर संपूर्ण आवार परिसराचा गौरव झाला आहे.
आयुष्याच्या पुढील प्रवासात विवेकानंदांच्या विचारांप्रमाणे ध्येयवादी राहा आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्या." याप्रसंगी बोलताना अध्यक्ष रामकृष्णजी गुंजकर म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांचे नसून, त्यांच्या कष्टाचे, पालकांच्या विश्वासाचे आणि आमच्या शिक्षक टीमच्या समर्पणाचे फळ आहे. भविष्यातही हे कॉलेज ग्रामीण भागातील गुणवंतांना घडवण्यासाठी कटिबद्ध राहील." सचिव सौ. सुरेखाताई गुंजकर यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी
१) श्वेता विठ्ठल उन्हाळे - ९३.५०%२) नीरज गोपाळ उन्हाळे - ९३.३३% ३) श्रवण रवींद्र कन्नर - ९२.५०% ४) कुणाल अजय अग्रवाल - ९२.५०% ५) रौनक विक्रम तिवारी - ९२.००% ६) तन्मय संतोष गिते - ९१.६७% ७) आदिश विशाल पाटणी - ९१.३३% ८) प्राची प्रशांत सुरवाडे - ९१.१७% ९) शर्वरी गजानन बोरसे ९१.१७% १०) शर्वरी राजेश इंगळे - ९१.१७% ११) आर्यवर्धन अजबराव भोजने - ९०.८३% १२) सार्थक विकास खत्री - ९०.८३% १३) प्राची रमेश ठोसरे - ९०.६७% १४) राहिणी नितीन चौकसे - ९०.६७%१५) गिरिराज कैलास बरोज्या - ९०.५०% १६) प्राची सुभाष काळणे - ९०.३३% १७) गिरीश राजेंद्र दांडगे - ९०.१७% १८) प्रतीक अनिल खंडारे - ९०.००%
गुंजकर कनिष्ठ महाविध्यायाचे १८० विध्यार्थी हे ८० टक्के पेक्ष्या जास्त गुण प्राप्त विध्यार्थी
"शिखर यशाचे सर तुम्ही केले,
स्वप्न उराशी जे बाळगले,
मेहनत अन् जिद्दीच्या जोरावर,
आकाश यशाचे तुम्ही गाठले!"
जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, आवार (ता. खामगाव) येथील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या परीक्षेत १००% निकाल मिळवल्याबद्दल समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!
स्वामी विवेकानंद म्हणतात, "शक्ती म्हणजे जीवन आणि कमजोरी म्हणजे मृत्यू." तुम्ही तुमच्या कष्टाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही शक्ती सिद्ध केली आहे. वर्गातील ते अभ्यासाचे तास, सराव परीक्षांमधील तुमची चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनावर ठेवलेला विश्वास, याचेच हे गोड फळ आहे.
शुभेच्छुक:
• संस्था अध्यक्ष श्री. रामकृष्णजी गुंजकर
• संस्था सचिव सौ. सुरेखाताई गुंजकर
• प्राचार्य श्री. सतिश रायबोले
• सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी
• जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, आवार
0 Comments