*_गुंजकर एज्युकेशन हब' व 'डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन_*
खामगाव/(संतोष आटोळे )
१२ वी सायन्सचा निकाल लागल्यानंतर पुढे काय? मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रवेश कसा मिळवायचा? या सर्व प्रश्नांचे निरसन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी खामगावात एका विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्था, खामगाव द्वारे संचालित 'गुंजकर एज्युकेशन हब' आणि भारतातील नामांकित 'डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा रविवार, दिनांक २४ मे रोजी सकाळी ९:०० वाजता, नांदुरा रोडवरील 'श्रीहरी लॉन्स' येथे पार पडणार आहे.
या मेळाव्यात 'NEET' परीक्षेची निकालानंतरची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (Cap Rounds), कट-ऑफ (Cut-off) आणि देशातील टॉप मेडिकल कॉलेजेसची सविस्तर माहिती दिली जाईल. 'JEE' आणि 'MHT-CET' परीक्षांनंतर उपलब्ध असणारे पर्याय, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डेटा सायन्स, कॉम्प्युटर आणि कोर इंजिनिअरिंग शाखांमधील भविष्यातील संधींवर प्रकाश टाकला जाईल. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे अनुभवी प्राध्यापक आणि करिअर समुपदेशक विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करतील. तसेच विविध सरकारी व निमसरकारी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आणि सुलभ शैक्षणिक कर्जाबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.
*प्रवेश पूर्णपणे मोफत*
या मेळाव्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून तो पूर्णपणे मोफत आहे. हा मेळावा विद्यार्थी आणि पालक या दोघांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याने, सर्वांनी एकत्र उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी प्रा. रामकृष्ण गुंजकर सर (९८५०३२७८११)
प्राचार्य सतीश रायबोले (८२०८०९०६४९) यांच्या सोबत संपर्क साधावा.
0 Comments