Advertisement

जळगाव जामोदमध्ये २२ लाखांचा गुटखा जप्त; ‘मकोका’ लावून मास्टरमाइंडचा शोध घेण्याची मागणी… सौ गीता सोनोने उपसंपादक अहिल्या न्युज आवाज 24 सातपुड्याचा

जळगाव जामोदमध्ये २२ लाखांचा गुटखा जप्त; ‘मकोका’ लावून मास्टरमाइंडचा शोध घेण्याची मागणी…

 सौ गीता सोनोने उपसंपादक अहिल्या न्युज आवाज 24 सातपुड्याचा

:महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे वृत्त ‘दैनिक महासागर’ने ९ जुलै रोजी प्रमुखतेने प्रकाशित केले होते. या बातमीची गंभीर दखल घेत आणि उबाठा गटाचे बुलढाणा जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी केलेल्या तक्रारीनंतर, अन्न व औषध प्रशासनाने सापळा रचून जळगाव जामोद येथील निमखेडी वन तपासणी नाक्यावर मोठी धडक कारवाई केली आहे.​१० जुलै २०२६ रोजी च्या रात्री २:३० च्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे यांच्या पथकाने निमखेडी वन तपासणी नाक्यावर टाटा इंट्रा गोल्ड (क्रमांक MAT 535508TYC15411) या संशयित वाहनाला थांबवले.


मात्र, कारवाईदरम्यान गाडीचा चालक संधी साधून घटनास्थळावरून पसार झाला.या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये बी.एन.एस. आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे अधिक तपास करत आहेत.​​या कारवाईत ११,५५० पाकीट पान मसाला (रु. १०,३९,५००), ११,५०० पाकीट सुगंधी च्युइंग तंबाखू (रु. ६,९३,०००), मोबाईल (रु. ५,०००) आणि ५ लाखांचे वाहन असा एकूण २२,३७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.​या कारवाईनंतर उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.तसेच त्यांनी प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर कठोर अशा ‘मकोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा.तसेच जप्त केलेल्या गुटख्याचा मुख्य सूत्रधार (गुटखा माफिया) कोण आहे, याचा शोध तातडीने लावून त्याला अटक करावी.

जळगाव जामोद तालुक्यात गुटख्याचा हा काळा बाजार करणारे मोठे मासे कोण आहेत, हे शोधून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केली आहे.आता पोलीस आणि अन्न प्रशासन या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ही कारवाई करताना अन्नसुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, वनपरिक्षेत्राधिकारी निलेश काळे, जळगाव जामोद पोलीस विभागाचे पोलीस हेडकॉन्स्टेब तय्यब अली सय्यद, सचिन राजपुत,चालक पोहेकॉ. सचिन शेळके, वनविभागाचे कर्मचारी प्रणव हगवणे यांचे सह बहुसंख्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments