महाराणा मंडळ व शिवप्रताप संघटनेच्या वतीने बोरजवळा येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा
खामगाव/(संतोष आटोळे ) हिंदु स्वाभिमान महाराणा प्रतापसिंह यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये देश,धर्माच्या रक्षणासाठी जे कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.महाराणा प्रतापसिंह यांचे जीवन स्वाभिमान,त्याग आणि राष्ट्रभक्तीचे प्रतिक आहे. तरुण पिढीने महाराणाजींच्या संघर्ष आणि देशप्रेमापासुन तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथे हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त दि.21 मे 2026 रोजी महाराणा मंडळ व शिवप्रताप संघटनेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठनेते पंजाबरावदादा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे,खामगाव कृ.उ.बा.स.संचालक विलाससिंग इंगळे, दुर्गासिंग ठाकुर,नंदुसिंग तोमर,कल्याणसिंग तोमर, पंजाबसिंग तोमर,धिरज तोमर,रोहित तोमर, अभिजीतसिंग तोमर,गणेश वावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते आकर्षक रथामध्ये असलेल्या महाराणाजींच्या अर्धाकृती पुतळयाचे पुजन करुन माल्यार्पण करुन आरती करण्यात आली.तद्नंतर फटाक्यांची भव्य आतिषबाजी करुन शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या शोभायात्रेमध्ये बोरजवळा येथील महाराणा मंडळ व शिवप्रताप संघटनेचे तरुण कार्यकर्ते व राजपुत समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.तरुणांनी हातामध्ये भगवा ध्वज घेवुन जब तक सुरज चाँद रहेंगा, महाराणाजीका नाम रहेंगा, हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह की जय अश्या गगनभेदी घोषणा दिल्या.
0 Comments