*महाराष्ट्र धनगर समाज महासंघाची आष्टा येथे राज्यस्तरीय बैठक संपन्न*
*समाज संघटन, आरक्षण व विविध प्रश्नांवर सखोल चर्चा*
आष्टा (जि. सांगली) : महाराष्ट्र धनगर समाज महासंघाची राज्यस्तरीय बैठक आष्टा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर, संघटन बळकटीकरण, शैक्षणिक व सामाजिक विकास तसेच आरक्षणासंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे, प्रदेशाध्यक्ष चिमणभाऊ डांगे, महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. अलकाताई गोडे, माजी महामंत्री सुभाषराव सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार, सुभाष करे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अंकुश निर्मल यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. युवकांनी शिक्षण, रोजगार, उद्योग व सामाजिक नेतृत्वामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रम, सदस्य नोंदणी मोहीम तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करून पुढील कार्ययोजना निश्चित करण्यात आली. बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या राज्यस्तरीय बैठकीत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे, प्रदेशाध्यक्ष चिमणभाऊ डांगे, प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार, डॉ. सौ. अलकाताई गोडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
0 Comments