पतीने केला पत्नीचा खून जळगाव जामोद तालुका हादरला
उटी बुद्रुक येथे विवाहितेचा खून
24 वर्षीय विवाहिता लक्ष्मीचा जागीच मृत्यू
जळगाव जामोद दिनांक 8
तालुक्यातील उटी बुद्रुक येथील लक्ष्मी पवन धुंदाळे या 24 वर्षीय विवाहितेचा दिनांक 7 व 8 च्या मधल्या रात्रीत साडेबारा (00:30)वाजता
रात्री धारदार शस्त्राने खून झाल्याचे उघड झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की ,
उटी बुद्रुक येथील पोलीस पाटील संदीप गटमने43 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उटी बुद्रुक येथे धुंदाळे परिवार राहत असून परिवारात चार सदस्य आहेत.
त्यामध्ये गजानन धुंदाळे व पुष्पा धुंधाळे या दाम्पत्याच्या घरी दोन वर्षे आधी लग्न होऊन त्यांचा मुलगा पवन धुंदाळे हा पत्नी लक्ष्मी धुंदाळे सह राहायचा त्यांना सात महिन्याची मुलगी देखील आहे, सर्व कुटुंब शेती काम करते.
पवन धुंदाळे चे बाबा गजानन धूदाळे हे रात्री पोलीस पाटील कडे एक वाजता धावत येऊन घरी भांडण होऊन त्यांची सून लक्ष्मी ही रक्ताच्या थारोळात पडली असल्याचे सांगितले.
पोलीस पाटील यांनी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी डॉक्टर पोलीस सर्वांना बोलावून डॉक्टरांनी लक्ष्मीला मृत घोषित केले
, फिर्यादीत लिहिलं नुसार पोलीस पाटलांनी पवन धुंदाळेला विचारल्यावर त्याने पत्नीवर कुराडीने वार करून तिला मारले असल्याचे सांगितले. पत्नी लक्ष्मी आरोपीस नेहमी तुम्ही काही कामाचे नसून बाहेर जा कुठेतरी मरून जा, असे म्हणून अपमान करायची त्यामुळे चिडून आरोपी पवन ने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत लिहिले आहे.
या संबंधित पोलीस स्टेशन जळगाव जामोद ने कारवाई करताना कायमी अप क्रमांक 580/ 2025 सेक्शन 103(1) BNS2023 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी फिर्यादी संदीप सदाशिव गटमने वय 43 पोलीस पाटील उटी बुद्रुक असून आरोपी पवन गजानन धुंदाळे व 28 राहणार उटी जळगाव जामोद हा आहे.
याप्रकरणी दाखल अधिकारी स फौ कैलास सिनकर ब न 14 74
असून तपास अधिकारी म्हणून म.पो. उप.नि. स्नेहा शेडगे ह्या आहेत.
पतीनेच पत्नीचा खून केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेच्या रात्री झोपण्याआधी झालेल्या भांडणात पत्नीने पतीला तू काही कामाचा नाही कुठेतरी जाऊन मर असे म्हणून अपमानित केले त्यामुळे चिडून जाऊन घरातील कुऱ्हाडीने ती झोपेत असताना तिच्या मानेवर वार करून तिचा फोन केला असा उल्लेख फिर्यादीत केलेला आहे.
सोबतच्या छायाचित्रांमध्ये मृतक स्वर्गीय लक्ष्मी धुंदाळे, आरोपी पवन धुंदाळे
0 Comments