Advertisement

राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*खामगाव (संतोष आटोळे )

*राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*
खामगाव (संतोष आटोळे ) खामगाव येथील नामांकित राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचे तसेच शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रज्ज्वल देशमुख, कृष्णाली बोधनकर आणि इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी मानवी बोडखे यांचा प्रमुख समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शासकीय शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे. यंदा एकूण ११ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशानिमित्त शाळेच्या आवारात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राणा अशोककुमारजी सानंदा व शाळेचे प्राचार्य संजयजी शर्मा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक व समाजातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याची भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments