Advertisement

शिराळा येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजीराव नाईक यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसह शरदचन्द्र पवारांचे उपस्थितित भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश*

 *शिराळा येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजीराव नाईक यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसह  शरदचन्द्र पवारांचे उपस्थितित भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश* 


*इसलामपूर दि (प्रतिनिधी)*

 *इकबाल पीरज़ादे*

शिराळा येथे आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरी सत्कार, पक्ष प्रवेश व शेतकरी मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. मा. शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. येथील श्री शिव छत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमास शिराळा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते, शेतकरी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली. सुरवातीस सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी स्वागत व प्रास्तविक केले. मान्यवरांचे सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. यानंतर वाकुर्डे योजनेस 300 कोटी रुपये व वारणा डावा कालव्यास 300 कोटी रुपये तसेच वारणा धरण गळती प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी 54 कोटी रुपये दिल्याबद्दल जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांचा भव्य नागरी सत्कार मा. पवारसाहेब यांच्या हस्ते झाला. या शेतकरी मेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचेही स्वागत व सत्कार खासदार शरदचंद्र पवारसाहेब यांनी केला व शेतकरी मेळाव्यास संबोधित केले. दरम्यान आमदार मानसिंगभाऊ यांनी शिराळा मतदार संघात केलेल्या कामांचा आढावा सांगितला. प्रवेशबद्दल माजी राज्यमंत्री नाईकसाहेब यांनी तर नागरी सत्काराबद्दल मंत्री पाटीलसाहेब यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. सहकार मंत्री मा. ना. बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थितीत होते. आमदार अरुणअण्णा लाड, अविनाश पाटील, सारंग पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, रणधीर नाईक, सुस्मिता जाधव, बाबासाहेब मुळीक, रविंद्र बर्डे, सुनीतादेवी नाईक, सुनंदाताई नाईक, छायाताई पाटील, सुनीता देशमाने, अमरसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, सम्राटसिंग नाईक, संजय पाटील, रणजीत पाटील, विजयराव नलवडे, सुखदेव पाटील, बी. के नायकवडी, साधना पाटील, हर्षद माने, लिंबाजी पाटील, सुरेश चव्हाण आदी मान्यवर व शिराळा विधानसभा मतदारसंघातून विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments