Advertisement

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते सामान्य रुग्णालय येथे फळ व भोजन वाटप* खामगाव/(संतोष आटोळे)

*हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते सामान्य रुग्णालय येथे   फळ व भोजन वाटप* 
खामगाव/(संतोष आटोळे)      हिंदवी स्वराज्याच्या शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचे प्रतीक असलेले हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची तिथीनुसार 486 वी जयंती बुधवार दि.17 जून 2026 रोजी खामगाव शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते  सामान्य रुग्णालयातील लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या अन्नछत्रामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात आले. 
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, शहर उपाध्यक्ष नरहरी टिकार, मुन्नासिंह राजपुत,दुर्गासिंह ठाकुर,सुभाषसिंह ठाकुर,ईश्वर राणा, बाजार समितीचे संचालक विलाससिंग इंगळे,विजय काटोले,केशव कापले,रोहितसिंह राजपुत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या माध्यमातून सुरेशचंद्र अग्रवाल यांच्या संकल्प आणि प्रेरणेतुन मागील 6 वर्षापासुन सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना निःशुल्क भोजन वाटपाचा स्तुत्य उपक्रम निरंतरपणे सुरु असुन यामध्ये एकही दिवस खंड पडलेला नाही. हा उपक्रम राबविण्यासाठी लॉयन्स क्लब संस्कृती खामगावचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात आले.या अन्नदान उपक्रमामध्ये पोळी-भाजी, मसाला भात तसेच बिस्कीट पुड्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाजातील गरजू व गरजवंत घटकांच्या सेवेसाठी योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.अश्या सामाजिक उपक्रमातुन  मानवता आणि परोपकाराची भावना जोपासत  सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तद्नंतर महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त सामान्य रुग्णालयातील रुग्णांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते फळ व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी रुग्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. या कार्यक्रमाला  आकाश घोडके, अशोकबाप्पु देशमुख,गणेश पाटील,मुकुंदसिंग इंगळे,गणेश ताले,अन्सार भाई,सनी ससाने, तुषार राजपुत, मोहित पवार,अभिषेक सोळंके,गजानन बगाडे,अमोल राणा,आदित्य पवार,मोहनसिंग सिसोदिया,अभिजीत राजपुत, अभिजीत बोराडे यांच्यासह राजपुत समाज बांधव व लॉयन्स क्लब संस्कृती खामगावचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments