Advertisement

एकनिष्ठा गौ सेवकांनी जीव धोक्यात टाकून नंदीला दिले जीवनदान*खामगाव/(संतोष आटोळे

*एकनिष्ठा गौ सेवकांनी जीव धोक्यात टाकून नंदीला दिले जीवनदान*
खामगाव/(संतोष आटोळे ) प्रशासन ही हतबल, मात्र एकनिष्ठा गौ सेवकांनी खूर मध्ये लोखंडी डबा अडकून तडफणाऱ्या नंदीची अखेर केली सुटका दाखवले धाडस: 8 दिवसा पासून शहरातील *नांदुरा रोड स्थित देवेंद्र हॉटेलच्या मागच्या गल्लीत, बंद पडलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या क्षतीग्रस्त झालेल्या बिल्डिंग प्लॉटमध्ये* टाकलेल्या कचऱ्यामुळे एका मुक्या गौ वंश बैलाला आठ दिवस नरकयातना सहन कराव्या लागल्याची हृदयद्रावक घटना आज उघडकीस आली. या प्लॉटमधील लोखंडी पत्र्याचा धारदार डब्बा एका बेवारस नंदीच्या *समोरच्या उजव्या पायाच्या खुरात* घट्ट फसला होता. *पायात डबा अडकल्याने पायाला गंभीर जखम होऊन असह्य दुःखाने सैरा वैरा झालेला* हा नंदी गेल्या आठ

 दिवसांपासून रस्त्यावर बिथरून मोठाली शिंगे उगारून नागरिकांच्या अंगावर धावून जात होता. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. *नागरिकांनी व परिसरातील लोकांनी नंदीला पकडून त्याची सुटका करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु आक्रमक नंदीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले नाही.* घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन *नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील अथक प्रयत्न केले.* त्यांनी काठ्या व इतर साधनांचा वापर करून नंदीला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेदनेने पिसाळलेला नंदी कुणाच्याही हाती लागत नव्हता. *प्रशासनाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने* नागरिक हतबल झाले होते. शेवटी आज सकाळी घटनेची माहिती *एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे जांबाज गौसेवक सुरजभैय्या यादव* यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी *गौसेवक गौरव कवटेकर, रोहीत तायडे, चेतन तंबोले* यांना सोबत घेऊन क्षणाचाही विलंब न करता देवेंद्र हॉटेल मागील घटनास्थळ गाठले. बंद पडलेल्या व क्षतीग्रस्त बिल्डींग प्लॉटमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभा असलेला, रक्तबंबाळ पायाचा व आक्रमक झालेला मारकुंडा नंदी पाहून काळजात चर्रर्र झाले. मात्र, *आपला जीव धोक्यात घालून सलग दोन तास अथक परिश्रम करत* सुरजभैय्या यादव यांनी प्रसंगावधान, धाडस व कौशल्य दाखवत दोरीच्या साहाय्याने शिंगेत फास टाकून नंदीवर काबू मिळवला. जीवघेण्या झटापटीनंतर त्यांनी अत्यंत धोकादायक परिस्थितीत नंदीच्या खुरात रुतून बसलेला लोखंडी डबा सुखरूप बाहेर काढला व डॉक्टर श्रीराम ठोंबरे यांना बोलावून त्यांच्याकडून इंजेक्शन औषधोपचार करण्यात आले *आठ दिवसांच्या नरकयातनातून मुक्या नंदीची सुटका केली.* सुटका होताच नंदीने सुटकेचा निःश्वास टाकला व शांतपणे निघून गेला.*सुरजभैय्या यादव म्हणाले,* "देवेंद्र हॉटेल मागील बंद सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या क्षतीग्रस्त प्लॉटमध्ये टाकलेल्या कचऱ्यामुळे एका मुक्या जीवाला आठ दिवस रक्तबंबाळ होऊन तडफडावे लागले. नागरिक व नगरपालिकेचे प्रयत्न कमी पडले, कारण हा नंदी वेदनेने पिसाळला होता. आम्ही दोन तास जीव मुठीत धरून रेस्क्यू केला. नागरिकांना विनंती आहे की सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः बंद पडलेल्या प्लॉटमध्ये कचरा, लोखंडी वस्तू टाकणे बंद करावे. मुक्या जनावरांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे." देवेंद्र हॉटेल मागील बंद प्लॉटमध्ये समोरच्या उजव्या खुरात डबा फसलेला व रक्तबंबाळ पायाचा नंदी. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात वेदनेने सैरा वैरा झालेला नंदी - सार्वजनिक अस्वच्छतेचे दुष्परिणाम. नगरपालिका कर्मचारी प्रयत्न करताना - मात्र यश नाही.  सुरजभैय्या यादव यांनी जीव धोक्यात घालून दोरीने नंदीला नियंत्रित केले. गौसेवकांनी धाडसाने नंदीला काबूत आणलेला क्षण फार भयानक होता.  दोन तासांच्या जीवघेण्या रेस्क्यूनंतर जांबाज गौसेवक सुरजभैय्या यादव यांनी नंदीच्या खुरातील डबा काढून हातात धरला.  अशी माहिती योगेश राऊत यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments