Advertisement

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकराच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न...


 *राजमाता पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकराच्या जयंतीनिमित्त  विविध कार्यक्रम संपन्न....!*

आज ३१ मे. रोजी

स्वराज्यनिष्ठ, लोकाभिमुख रणरागीणी राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या  जयंती निमित्त त्यांच्या समाज उध्दारक कार्य, प्रेरणादाई सक्षम विचारांना व दैदिप्यमान कार्याला उजाळा देत अभिवादन करण्यात आले. आज सकाळी प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्या नंतर मराठी उच्च प्राथमिक शाळेसमोर राजमाता पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकरांच्या प्रतिमेचे अनावरण करून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर धानोरा येथे नव्यानेच बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या इमारतीसमोर वृक्ष रोपण करण्यात आले त्यावेळी  माजी जिल्हा परिषद सदस्य पती विजयभाऊ तिवारी,सरपंच पती,विश्वभर वावगे, गाव चे पोलीस पाटीलसंघपाल अवचार, तंटामुक्ती चे अध्यक्ष श्रीकृष्ण वानखडे धानोरा ग्रा प चे सदस्य संदीप भोपळे,दादाराव सावळे,अतुल खूपसे , अजय पाटील,अमोल वानखडे,अमोल रायपुरे भागवत भाऊ खांडपे अजय साबे राजू घुले  निलेश  खाडपे गजानन वाघमारे श्रीकांत पाचपोर मयूर  व सत्कारअजय व सत्कार ऋषी बाजोडे श्रीकांत बाजोडे  समस्त धनगर समाज व गावांतील ग्रामस्थमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित व्होते,त्यानंतर महाप्रसादचा कार्यक्रम ,व रांगोळी स्पर्धा आयोजित करून बक्षीस वितरण करण्यात आले, त्यामध्ये प्रथम बक्षिस कु. आचल  साबे,दुसरे बक्षीस कु.जोस्ना इंगळे,तिसरे बक्षीस कु दीपाली उदयकार, चौथे बक्षीस कु.नम्रता भिवटे यांना अनुक्रमे धानोरा गांवच्या सरपंच सौ.वैशाली वावगे,माजी सरपंच सौ.उर्मिलाताई कुवारे, माजी सरपंच श्री अजय खूपसे (पाटील)व जय मल्हार मित्र मंडळ धानोरा यांचे वतीने देण्यात आले.त्या वेळी दिलीप भिवटे प्रमोद सपकाळ अविनाश भाऊ उमरकर प्रमोद भाऊ तितरे बंडूभाऊ पाटील प्रकाश वाघ दिगंबर हिवरकर मनोहर भाऊ खाडपे प्रकाश ढोकणे सुनील भिवटे हरीभाऊ वाघमारे भिवटे सर वाघमारे सर व सत्कार सर कुवारे गुरुजीभटकर सर  वरून आलेल्या मान्यवरांची उपस्थिती होती. संध्याकाळी बँड पथकं व मल्हारी च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. अशा विविध कार्यक्रमाचे यशस्वीरित्या करण्यात आले

 जय मल्हार मित्र मंडळ  व गावकरी धानोरा महा

Post a Comment

0 Comments