जळगांव जामोद:-दिनांक २७ जुलै रोजी जळगांव जामोद येथिल वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुरग्रस्त पीडितांना एक हात मदतीचा म्हणुन मानवतचे दर्शन करून एक छोटासा प्रयत्न केला , जळगांव शहरातील जे पिडित, बेघर कुटुंब आहेत त्यांना जिवणाश्यक वस्तुमध्ये गहुआटा,तेल, साखर, चहा पावडर,मिरची पावडर,माचिस,हळद,मुंग दाळ,मसाला,नमक थैली,सह सह साडी अशाप्रकारे काही पीडितांना पक्ष कार्यालयात व नंतर घरपोच जाऊन किटचे वाटप करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा संघटक अरुणभाऊ पारवे, जिल्हा अध्यक्षा विशाखाताई साव़ंग,माजी तालुका अध्यक्ष रतनभाऊ नाईक, महिला नेत्या पार्वताबाई इंगळे,जेष्ठ कार्यकर्ते नारायण पारवे, तालुका उपाध्यक्ष सुनिल बोदडे,माजी तालुका अध्यक्षा वंदनाताई भगत, क्रुषि उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत अवसरमोल,जिल्हा सदस्या मंगलाताई विजय पारवे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर,शहर अध्यक्ष आजम कुरेशी,माजी तालुकाध्यक्ष अध्यक्ष एस डि झनकेसर , महिला तालुका अध्यक्षा सुनिता हेलोडे ,संतोष तिजारे , राहुल तायडे,विजय तायडे,आनंदा गवई, संतोष पवार,मनोज अंदुरकार,अमोल तायडे,बुद्धभुषण अरदळे, नितिन वानखडे,राजु तायडे,सह वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते व यानंतर जे पिडित कुटुंब असतील त्यांनाहि वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
0 Comments