*महापुरुषांच्या फोटोवर क्रॉस मारणे भोवले. गोळेगाव येथील युवकावर जळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल...*
जळगांव जा.प्रतिनिधी:-

सोशल मीडियावरील आपल्या टेटस वर महापुरुषांच्या फोटोवर लाल रंगाने क्रॉस मारणे जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव येथील युवकाला चांगलेच भावले असल्याने त्याच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सायबर क्राईम चा गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर असे की जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव नवीन येथील तरुणाने आपल्या सोशल मीडियावरील व्हिडिओ टेटस वर दिनांक 17 जुलै रोजी अरविंद केजरीवाल,असुवोद्दीन ओवेसी,अखिलेश यादव,राहुल गांधी यांच्यासह थोर महापुरुष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान पंडित नेहरू,टिपु सुलतान यांच्या व्हिडिओ वरील फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर लाल रंगाने क्रॉस केले होते व पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रभू श्रीराम व हनुमान, भगतसिंग सुखदेव राजगुरू छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बागेश्वर बाबा हे रियल हिरो असल्याचे त्या व्हिडिओ पोस्ट मध्ये टाकण्यात आले होते. संबंधित आरोपी पवन पुंडलिक घुळे राहणार गोळेगाव यांने या महापुरुषांच्या फोटोवर लाल रंगाने क्रॉस चिन्ह काढल्याने धार्मिक भावना दुखावल्या वरून आरोपी विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला वंचित बहुजन आघाडीचे सुनील बोदडे यांनी तक्रार दिल्याने आरोपी पवन घुले याच्या विरोधात अप नं 370/2023 कलम 505 (2) भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे हे करीत आहे.*
0 Comments