Advertisement

निमखेडी येथे वन महोत्सव साजरा* प्रतिनिधी नागेश भटकर

*निमखेडी येथे वन महोत्सव साजरा* प्रतिनिधी नागेश भटकर
*सामाजिक वनीकरण विभाग जळगाव जामोद, तथा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा निमखेडी, यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक 14 जुलै 2023 रोजी वन महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये स्थानिक अंगणवाडीमध्ये तथा जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.तसेच जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावामधून वृक्षदिंडी काढली. प्रसंगी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जळगाव जामोद यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले.प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जळगाव जामोद चे वनपाल श्री देठे , वन रक्षक श्री निकाळजे ,श्री गजानन तायडे, श्री सावळे तसेच जि प शाळेचे मुख्याध्यापक उमेश खारोडे , शिक्षक उमेश भड ,शिक्षक धनराज इंगळे,अंगणवाडी सेविका रेखा सोनवणे हे होते.* *श्री निकाळजे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इंगळे सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री खारोडे सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments