तांदळाच्या २०० कट्ट्यासह वाहन पकडले मलकापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.*
प्रतिनिधी नागेश भटकर
मलकापूर : रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करण्यासाठी जात असलेल्या वाहनासह २०० कट्टे तांदूळ शहरातील आठवडी बाजारात जप्त करून दोन आरोपींवर मलकापूर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हे दाखल केले. पोलिसांनी वाहन क्रमांक आरजे ३२ जीए ५४६३ हा उभा असलेला दिसल्याने त्यांची पाहणी केली. त्यामध्ये अंदाजे १५० ते २०० कट्टे तांदूळ दिसून आला. त्यावरून राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील
किसनगडबास तालुक्यातील दयापूर येथील ट्रकचालक कासिमखान नजरखान (५०) याची चौकशी केली असता तांदूळ मलकापूर शहरातील ताजनगर परिसरातील हसनखान अब्दुलखान (४०) याचा असल्याची माहिती दिली. तसेच अहमदाबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचेही सांगितले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरूद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील कलम ३, ७ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि. तायडे करीत आहेत..
0 Comments