मलकापूर येथील दिव्यांग लाभार्थी यांना 5 टक्के निधीचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी दिव्यांग मल्टिपर्पज फाऊंडेशन च्या वतीने नगरपरिषद मलकापूर येथे दिनांक 4 जुलै रोजी एका निवेदनाद्वारे मागणी केली होती,या मागणीचा पाठपुरावा करणे बाबत पुन्हा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना 3 ऑगस्ट रोजी स्मरण पत्र देण्यात आले यावेळी मुख्याधिकारी साहेब यांनी क्षणांचा ही विलंब न लावता तात्काळ चेक तयार करून दिला व आज रोजी दिव्यांग मल्टिपर्पज फाऊंडेशन च्या प्रयत्नानंतर दिव्यांग बंधून च्या खात्यात पैसे जमा झाले.
0 Comments