प्रतिनिधी : नागेश भटकर
जळगाव शहरातल्या मध्यभागी असलेल्या रामदेव नगरात 6 ऑगस्ट रोजी एकाच रात्री 3 घर फोडी झाल्याची घटना घडली चोरीचा मला परत भेटत नाही म्हणून काही नागरिक तक्रार करायला पुढे येत नाही
रामदेव नगरातील माझी प्राचार्य राजकुमार किसनलाल फाफट हे काही कामानिमित्त आपल्या मुलांकडे 31 सप्टेंबर रोजी पुण्याला गेले होते जेव्हा 6 ऑगस्ट रोजी ते घरी परतले तेव्हा त्यांना दिसले की घराच्या मुख्याद्वाराचा कुलूप तुटलेला आहे त्यांनी घरात प्रवेश केला आणि पाहणी केली असता घरातल्या अलमारीचा सामान अस्तव्यस्त होता आणि त्याच्यातून एक मोठी सोन्याची पोत 30 ग्राम व कानातले सोन्याची 5 रिंग टॉप 9 ग्राम सोन्याची डायमंड रिंग 3 ग्राम आणि 10 हजार नगदी असे एक 166000, रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार फाफट सरांनी जळगाव पोलीस ठाण्यात दिली
हेच नव्हे तर दिनांक 2 ऑगस्टला आदिवासी आश्रम शाळा जवळून एका मुलीच्या हातातून मोबाईल दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकून नेल्याची घटना घडली तेही जळगाव पोलीस स्टेशनच्या किमान 50 मीटर अंतरावर ही घटना घडली हेच नव्हे तर 6 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनच्या आवाराच्या जवळ एका शिक्षकाच्या हातातून मोबाईल हिसकून दोन अज्ञात चोरटे नेत असताना त्या शिक्षकांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना धक्का दिला ते खाली पडले आणि त्यांचा मोबाईल वाचला ह्या घटना जर पोलीस स्टेशनच्या जवळच घडतात याचा अर्थ काय चोट्यांमध्ये पोलीस प्रशासनाचा काहीच धाक राहिलेला नाही अशा प्रकारच्या घटना शहरांमध्ये पुन्हा घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष काळजी घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे अशा घटनांमुळे शहरासह तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाला आहे
0 Comments