प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वानखेडे येथे पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून झाल्याची घटना दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून घटनास्थळाला तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले ,पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके, जीवन सोनवणे बीड जमदार दयाराम कुसुंबे पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक वावगे प्रमोद मुळे ,गजानन गव्हांदे,संतोष डाखोकार, गोपनीय अंमलदार मनीष वानखडे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश डोके,सागर कांडेकर,चालक सेवानंद हिवराळे यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी यास अटक केली आहे. वानखेड येथील आकाश सुरेश परघमोर याचे व आरोपी त्रिशरण इंगळे व चाळीस वर्ष राहणार वानखेडे यांच्यासोबत शेतीचा वाद होता. तसेच आरोपी च्या पत्नी सोबत आकाश चे प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी त्रिसरण इंगळे यांने मृतक आकाशच्या मागे जाऊन आरोपी त्रिसरण इंगळे याने कमरेला असलेल्या धारदार चाकूने आकाशच्या डाव्या बगली च्या खाली भोसकून त्याचा खुन केला असून मृतक आकाश याचे शव प्राथमिक आरोग्य केंद्र वरुड बकाल येथे शविच्छेदना साठी आणले होते.सदर घटनेची तक्रार मृतक आकाश याची बहिण दीक्षा परघमोर हिणे तामगाव पोलीस स्टेशनला दिली.
फिर्यादी बहिणीच्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी आरोपी त्रिसरण इंगळे यांच्या विरोधात अप नं 243/2023 कलम 302,506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर देवराव गवळी यांनी भेट दिली असून पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके व पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड करीत आहे.
0 Comments