Advertisement

जळगाव जामोद येथे शनिवारी श्री गजानन विजय ग्रंथाचे महापारायण

जळगाव जामोद येथे शनिवारी श्री गजानन विजय ग्रंथाचे महापारायण

  प्रतिनिधी नागेश भटकर 
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने शनिवार दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २* या वेळात श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाचे आयोजन *देवाशिष लाँन* येथे करण्यात आले आहे.
    सदर पारायण *आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मुखोद्गत पारायण कर्त्या विद्याताई पडवळ,ठाणे* यांच्या अमृततुल्य वाणीतून पठण होणार आहे.तरी या पारायणाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.आपली नाव नोंदणी महेश पारस्कर,धनंजय देशमुख,ऋषिकेश कांडलकर यांच्याकडे करावी तसेच प्रत्येकाने आपल्या सोबत श्री गजानन विजय ग्रंथ सोबत आणावा.ज्यांच्याकडे विजय ग्रंथ नसेल त्यांना पारायणस्थळी विजय ग्रंथ पुरविण्यात येईल. महापारायणानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. 
  या महापारायणाकरिता मध्यप्रदेशातील खंडवा व भोपाळ येथून सुमारे २०० भाविक उपस्थित राहणार आहे.जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील भाविकांनी यामध्ये सहभागी होऊन श्रींच्या चरणी आपली सेवा समर्पित करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
*संपर्क-9767524535,9763565799,9405287614*

Post a Comment

0 Comments